भारती विद्यापीठाकडून आर.के .एम.चे एन. पी. पवार यांचा गौरव
By Admin | Published: May 16, 2016 12:45 AM2016-05-16T00:45:00+5:302016-05-16T23:25:14+5:30
कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.
कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ांतून आर. के. एम. माध्यमिक विद्यालय कळवणचे प्राचार्य एन. पी. पवार हे एकमेव प्राचार्य असून, भारती विद्यापीठाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या विविध स्पर्धांचे व कार्यक्र मांचे आयोजन कळवणसारख्या आदिवासी तालुक्यातील आर. के. एम. माध्यमिक विद्यालयात करून भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात भरीव योगदान दिल्याबद्दल हा सन्मान पूर्वक गौरव व सत्कार भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
भारती विद्यापीठाकडून दरवर्षी राज्यातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात, कळवणसारख्या आदिवासी तालुक्यातील आर. के. एम. माध्यमिक विद्यालयातील शेकडो विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेत सहभागी होत असून, आज अनेक आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थी भारती विद्यापीठात शिक्षण घेत आहे, भारती विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक प्रगती करून शिष्यवृत्ती मिळवली आहे. यात प्राचार्य एन. पी. पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना सहकार्य केल्याबद्दल भारती विद्यापीठाच्या ५२व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला.
कळवण येथेही कळवण शिक्षण संस्थेच्या वतीने प्राचार्य एन. पी. पवार यांचा संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार, सरचिटणीस बेबीलाल संचेती, प्राचार्य डॉ. रावसाहेब शिंदे, संचालक विश्वनाथ व्यवहारे, बाबूराव पगार, राफोद्दिन शेख, आर. के. महाजन, सुमनताई देवरे डी. एम. पगार यांनी सत्कार केला.
फोटो (१५कळवण)
भारती विद्यापीठ पुणे ५२व्या वर्धापनदिनी आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा सत्कार करताना भारती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आनंदराव पाटील. समवेत व्यासपीठावर सुधीर मुनगंटीवार, डॉ. पतंगराव कदम आदि.