विधी सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार
By admin | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:36+5:302016-06-08T01:50:36+5:30
पुणे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सांगितले.
Next
प णे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सांगितले. दिल्ली विद्यापीठ आणि अन्य काही विद्यापीठांची विधी सीईटी 19 जून रोजी होणार होती. महाराष्ट्र राज्याची विधी सीईटी सुद्धा 19 जून रोजी असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठांसह अन्य विद्यापीठांच्या सीईटीला बसता येणार नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने दिल्ली विद्यापीठ आणि अन्य विद्यापीठांना तारखांच्या बदलांबाबत विनंती केली होती. त्यानुसार दिल्ली विद्यापीठाने तसेच अन्य विद्यापीठांनी त्यांंच्या विधी सीईटीच्या तारीखेत बदल केले आहेत. त्यामुळे राज्यात 18 आणि 19 जून रोजी होणारी विधी सीईटी नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे,असेही डॉ.माने यांनी सांगितले.