शाळा महाविद्यालय २
By admin | Published: August 10, 2015 11:28 PM2015-08-10T23:28:28+5:302015-08-10T23:28:28+5:30
कुंभलकर समाजकार्य महाविद्यालय
Next
क ंभलकर समाजकार्य महाविद्यालयनागपूर : कुंभलकर समाजकार्य सांध्यकालीन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने कामगार भवन, रघुजीनगर परिसरात श्रमदानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. विनायक साखरकर यांच्या नेतृत्वात महाविद्यालयातील रासेयोचे ५० विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले. डॉ. साखरकर यांनी स्वच्छतेचे महत्त्व विशद करून परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन केले. याप्रसंगी कामगार कल्याण निरीक्षक लुले, डॉ. लक्ष्मीकांत चोपकर व प्रा. संगीता पाठराबे उपस्थित होते.नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयनागपूर : नवप्रतिभा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी शाखेत वर्ग ११ वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पालक-शिक्षक संघाची यावेळी स्थापना करण्यात आली. जीवनविकास शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र झाडे, कार्याध्यक्ष बाबूराव झाडे प्रामुख्याने उपस्थित होते. पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्या माधुरी झाडे व उपाध्यक्षपदी दिलीप भांडारकर यांची निवड करण्यात आली. सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूलनागपूर : वर्धमाननगर येथील सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल येथे फर्स्ट ट्रॅफिक सिग्नल दिवस साजरा करण्यात आला. १९१४ साली क्लीव लँड ओहिओ येथे हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. या दिनानिमित्त अखिलेश गुप्ता यांच्या नेतृत्वात यामाहा मोटर्सच्या टीमद्वारे वाहतुकींच्या नियमांची माहिती देणारा एक कार्यक्रम सादर करण्यात आला. शाळेचे संचालक प्रवीण तिवारी यांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली. शाळेच्या समन्वयक फिजा खान यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.सेवादल महिला महाविद्यालयनागपूर : सेवादल यिक्षण संस्थेंतर्गत सेवादल महिला महाविद्यालयातर्फे बांधलेल्या नरसाळा परिसरातील मुलींच्या वसतिगृहाचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आ. सुधाकर कोहळे, जि.प. सदस्य डॉ. शिवाजीराव सोनसरे, नेहरूनगर झोन सभापती मनीषा कोठे, संस्थेचे संस्थापक सदस्य केशवराव शेंडे, प्राचार्य प्रवीण चरडे तसेच विदर्भ बुनियादी महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी. कारमोरे प्रामुख्याने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष संजय शेंडे यांनी प्रास्ताविक केले.