शाळा महाविद्यालय... जोड

By admin | Published: February 20, 2015 01:09 AM2015-02-20T01:09:55+5:302015-02-20T01:09:55+5:30

राम गणेश गडकरी महाविद्यालय, सावनेर

School college ... add | शाळा महाविद्यालय... जोड

शाळा महाविद्यालय... जोड

Next
म गणेश गडकरी महाविद्यालय, सावनेर
सावनेर : स्थानिक राम गणेश गडकरी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. उद्घाटन मधुकर टेकाडे यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी. जि. प. उपाध्यक्ष शेषराव राहाटे होते. यावेळी गजानन निखाडे, शंभुदयाल तिवारी यांची उपस्थिती होती. प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, बौद्धिक व क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. समारोपीय कार्यक्रमास संस्थेचे सचिव प्रा. विजय टेकाडे, किशोर ढंढेले, प्रा. योगेश पाटील, रितेश पाटील, शुभांगी पांडे आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातून विद्यापीठ परीक्षेत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. संचालन प्रा. असलकर यांनी तर आभार प्रा. फरकाडे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
......
नगर परिषद हायस्कूल, नरखेड
नरखेड : स्थानिक नगर परिषदेच्या सर्व शाळांचे संयुक्त स्नेहसंमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार एच. टी. झिरवाळ, नगराध्यक्ष हेमलता टेकाडे, ठाणेदार दीपक गोतमारे यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रसंगी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. समारोपीय कार्यक्रमास खा. कृपाल तुमाने उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी मार्गदर्शनात शाळांना १० संगणक संच देण्याची घोषणा केली. यावेळी सुप्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी व ज्ञानेश्वर रक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजेत्या शाळा व स्पर्धकांना गौरविण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्ष हेमलता टेकाडे, उपाध्यक्ष अशफाक कुरेशी, बीडीओ प्रशांत मोहोड, सभापती निर्मला गजबे, प्रशांत खुरसंगे, ममता दुर्गे, सोनम कळंबे, गोपाल टेकाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण प्रशाासन अधिकारी जयंत खरबडे यांनी केले. आभार मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: School college ... add

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.