ंमनपाची बंद असलेली शाळा नं.३ पुन्हा सुरू होणार जे.पी.सी.बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट सुरू करणार शाळा
By admin | Published: March 23, 2017 05:19 PM2017-03-23T17:19:14+5:302017-03-23T17:19:14+5:30
जळगाव-समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्ज्याचे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्राप्त व्हावे तसेच कुणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्देशाने जळगाव पिपल्स बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे शहरातील मनपाची सेंट्रल स्कूल नंबर ३ ही बंद असलेली शाळा येत्या १५ जून पासून जळगाव पब्लिक स्कूल म्हणून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Next
ज गाव-समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्ज्याचे इंग्रजी माध्यमांचे शिक्षण प्राप्त व्हावे तसेच कुणीही दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहु नये या उद्देशाने जळगाव पिपल्स बॅँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे शहरातील मनपाची सेंट्रल स्कूल नंबर ३ ही बंद असलेली शाळा येत्या १५ जून पासून जळगाव पब्लिक स्कूल म्हणून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जळगाव पिपल्स बॅँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, उमविचे माजी कुलगुरू डॉ.के.बी. पाटील, डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. देविदास सरोदे, चंदन अत्तरदे आदी उपस्थित होते. समाजातील आर्थिक दुर्र्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत व चांगल्या दर्ज्याचे शिक्षण मिळावे हा उद्देश ही शाळा सुरू करण्याचा असल्याची माहिती प्रकाश चौबे यांनी दिली. प्रवेशाला सुरुवात१५ जून पासून शाळेत नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीयर केजी व पहिली अशा चार वर्गांना सुरू केली जाणार असून, शाळेच्या प्रवेशांना सुरुवात झाली आहे. या शाळेत सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंच्या विकासासाठी सुसज्ज ग्रंथालय, ई क्लासरूम आदी सुविधा या शाळेत पुरविल्या जाणार आहेत. शिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य गणवेश, बुट्स, स्कूल बॅग, वा व पुस्तके शाळेतर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे. शाळेत विद्यार्थी संख्या मर्यादित राहणार असल्याने पालकांनी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.