रासबिहारी स्कूलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन
By Admin | Published: October 11, 2016 12:02 AM2016-10-11T00:02:44+5:302016-10-11T01:14:00+5:30
सिडको : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या स्मृतीदिनानिमित्त इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिटी सेंटर मॉल येथील ग्रॅँड बॉलरूम येथे दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे मुख्य प्रवर्तक कुवर दीपक सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलचे इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी स्वत: तयार ३० हून अधिक विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे नि:संशय महान वैज्ञानिक व सर्वधर्मसमभाव असणारे व्यक्तिमत्त्व होते. आज ते हयात नसले तरी देशातील प्रत्येक माणसाच्या हृदयात आणि मनात असून, विज्ञान तसेच जीवनात आगेकूच करून त्यांची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रेरित करीत आहे. त्यांच्या कार्याच्या स्मृतीला स्मरण करून हे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले असून, नाशिकमधील सर्व प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच इच्छुक व विज्ञान विषयाची आवड असणार्या सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले असल्याचेही दीपकसिंग यांनी सांगितले. (वार्ताहर)