आंतरशालेय स्पर्धेत शांता विद्यालय अग्रेसर
By Admin | Published: February 5, 2016 12:34 AM2016-02-05T00:34:16+5:302016-02-05T00:34:16+5:30
आंतरशालेय स्पर्धेत शांता विद्यालयाचे यश
आ तरशालेय स्पर्धेत शांता विद्यालयाचे यश थिवी : म्हापसा-गणेशपुरी येथील र्शी गणेश विद्यामंदिरने बार्देस तालुका पातळीवर आयोजित केलेल्या आंतरशालेय स्पर्धेमध्ये र्शी शांता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची भरारी गाठली. घोषवाक्य व त्याचा अर्थ लिहिणे या स्पर्धेमध्ये र्शी शांता विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धांत कासकर व संपदा रायकर यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्याचप्रमाणे नाट्यछटा स्पर्धेत नेहा पाठक हिला दुसर्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थी चेतन मेस्त्री व गुलाबशा खान यांना दुसर्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. सर्व विजेत्यांना चषक, रोख रक्कम व प्रशस्तिपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षक विश्वास सांगळे व शिक्षिका विषया आमणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर) फोटो : विजेत्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक शशिकांत नाईक व इतर शिक्षक. (भारत बेतकेकर) 3001-एमएपी-12