रासबिहारीच्या हस्ताक्षर स्पर्धेत शिंदे, अन्सारी प्रथम
By admin | Published: August 3, 2016 10:15 PM2016-08-03T22:15:31+5:302016-08-03T22:53:10+5:30
नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इ. ३री ते इ. ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित हस्ताक्षर स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात गट अ, ब आणि क असे तीन ग्रुप करण्यात आले. गट अ मध्ये तिसरी, गट ब मध्ये चौथी आणि गट कमध्ये पाचवीचे विद्यार्थी सहभागी झाले. ही स्पर्धा वर्गानुसार घेण्यात आली आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अनिवार्य होती. दोन शब्दांमधील अंतर, लिहिण्याची पद्धत, अक्षरांचे वैशिष्ट्य, आखीव रेषांमध्ये अक्षर असणे, सुबक, व्यवस्थित अक्षर असणे आणि कमीत कमी खोडरबरचा वापर करणे इत्यादि निकषांवर ही स्पर्धा आधारलेली होती. हस्ताक्षर स्पर्धेत गट अ मध्ये गायत्री शिंदे प्रथम, रिद्धिश दिंडे द्वितीय, सई जाधव तृतीय, गट ब मध्ये सिमरन अन्सारी प्रथम, तुषार बागुल द्वितीय, रिया मंडल तृतीय, तर गट क मध्ये ज्ञानेश्वरी देवरे प्रथम , कस्तुरी जाधव द्वितीय, तर प्रणव गिते याने तृतीय क्रमांक पटकावला.

फोटो-आरला ०३ रासबिहारी स्कूल नावाने सेव्ह