सिंगल बातम्या...
By admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:38+5:302015-09-03T23:05:38+5:30
वीरतपस्वीमध्ये संस्कृत दिन साजरा
Next
व रतपस्वीमध्ये संस्कृत दिन साजरासोलापूर : र्शी बृहन्मठ होटगी संचलित भवानीपेठेतील एसव्हीसीएस हायस्कूलमध्ये संस्कृत दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, उपमुख्याध्यापक गिरमल बुगडे, पर्यवेक्षक महादेव वांगीकर आदी उपस्थित होते. लावण्या नंदाल,र्शद्धा मड्डे,ज्योती ढमढेरे, अक्षय बोने, रितू लोहार, श्वेता कल्याणी, संस्कृती बंडगर या विद्यार्थ्यांनी संस्कृतमधील सुभाषीते, गीते, संवाद, कथा, नाटक सादर केले. सूत्रसंचालन व आभार सत्यव्रत आर्य यांनी मानले. प्रयोगशाळा कर्मचार्यांची समस्या सुटणारसोलापूर : राज्यातील 15 हजार प्रयोगशाळा कर्मचार्यांचा तृतीय वर्गाच्या र्शेणीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष आ. अनिल बोंडे यांनी दिले. अमरावती येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोंडे यांनी हे आश्वासन दिल्याचे जिल्हा संघटनेचे सचिव भीमगोंडा बिराजदार, सहसचिव शशीधर गिरी, संघटक चोपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. प्रयोगशाळा कर्मचार्यांना अतिरिक्त ठरविण्याचा प्रयत्न झाला. पण हे पद स्वतंत्र संवर्गाचे असताना चतुर्थ संवर्गात गणना होते.लोधी समाजातील तरुणावरील हल्ल्याचा निषेधसोलापूर : दोन गटात झालेल्या भांडणास जातीय दंगलीचे स्वरूप देऊन शहर पोलिसांनी रुबाब दाखविण्यासाठी लोधी समाजातील तरुणांवर लाठीहल्ला करून मानवी हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या लाठीहल्ल्याचा डॉ. आंबेडकर स्टुडंट्स युथ असोसिएशनचे उत्तम नवघिरे यांनी निषेध केला आहे. परिस्थिती हाताळताना पोलिसांनी सीआरपीसी 129 मधील तरतुदीचा भंग केला असल्याचे पत्रक जिल्हा संघटक सागर वाघमारे, शहर अध्यक्ष शेखर बंगाळे, संतोष गजभार, दीपक गवळी यांनी काढले आहे.सोशल महाविद्यालयात 62 जणांचे रक्तदानसोलापूर : सोलापूर सोशल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र योजनेच्या 62 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. ए. दलाल, उपप्राचार्य डॉ. एफ. एम. सय्यद, डॉ. गौस शेख, डॉ. र्शीकांत येळेगावकर, सलीम शेख, डॉ. इ. जा. तांबोळी उपस्थित होते. लायन्स क्लब सोलापूर सेंटरचे गौतम ओसवाल, राजू चौधरी, आसीम बांगी, सचिन राजगुरू,चंद्रकांत रच्चा, अँड. र्शीनिवास कटकूर, आझम शेख, विठ्ठल सारंगी, रमणलाल सोनमिंडे यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.