सिंगल न्यूज..१

By admin | Published: August 19, 2015 10:27 PM2015-08-19T22:27:39+5:302015-08-19T22:27:39+5:30

कलाशिक्षक कार्यशाळा

Single News.1 | सिंगल न्यूज..१

सिंगल न्यूज..१

Next
ाशिक्षक कार्यशाळा
अहमदनगर: शालेय कलाशिक्षक आणि शासकीय रेखाकला परीक्षेच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाल्याने जिल्ह्यातील सर्व कलाशिक्षकांना एकाचवेळी प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे २० ऑगस्ट रोजी आयोजन केल्याची माहिती कला शिक्षक संघाच्या वतीने दिली आहे.
....
नागपंचमी उत्साहात
अहमदनगर: नेप्ती येेथे जुन्या रुढीनुसार पारंपरिक पध्दतीने नागपंचमी उत्साहात साजरी झाली. महिलांनी वारूळाचे पूजन करून सापांना न मारण्याची शपथ घेतली.
...
हागणदारीमुक्तीचा संकल्प
अहमदनगर: नेप्ती येथे ग्रामसभेत गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश वाटप करण्यात आले. सरपंच मीरा जपकर उपस्थित होत्या.
...
जालिंदर बोरुडे यांना पुरस्कार
अहमदनगर: विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल जालिंदर बोरुडे यांना नागरदेवळे ग्रामस्थांच्या वतीने आ. शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते नागरदेवळे भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सरपंच राम पानमळकर उपस्थित होते.
....
मूकबधिर विद्यार्थ्यांना अन्नदान
अहमदनगर: सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त सोमवारी शेंडी येथे सावता माळी युवक संघ व शिवरुद्र बहुद्देशीय संस्थेच्या वतीने अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान कार्यक्रम राबविला.
.....
बौध्द समाजाचा
वधू-वर मेळावा
अहमदनगर: बौध्द समाजाच्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संबोधी विद्यालयात वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यास पालकांनी वधू-वरांना घेऊन उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
...
पाचारणे उपाध्यक्ष
अहमदनगर: रिपाइंच्या (आठवले गट) जिल्हा उपाध्यक्षपदी संजय पाचारणे तर पक्ष संपर्कप्रमुखपदी श्रीकांत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी एका बैठकीत नगर येथे ही निवड करण्यात आली.
...
देहदान संकल्प
अहमदनगर: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपल्या देहाची मरणानंतर राख होण्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रातील मुलांना अभ्यासासाठी उपयोग व्हावा, तसेच सामाजिक जाणीवेचा कृतीशील भाग म्हणून २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता झोपडी कॅन्टीनजवळील एका हॉस्पिटलमध्ये देहदानाचा संकल्प केला आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली.
...
राज्यस्तरीय भजन स्पर्धा
अहमदनगर: स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यस्मरणार्थ झालेल्या राज्यस्तरीय अभंगवाणी भजन स्पर्धेत ६५ संघांनी सहभाग घेतला. यात नगरमधील गुरुप्रसाद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, अशी माहिती संयोजकांनी दिली.
....

Web Title: Single News.1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.