सिंगल प?ा
By Admin | Published: December 23, 2015 02:13 AM2015-12-23T02:13:43+5:302015-12-23T02:13:43+5:30
आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद
आ ोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद सोलापूर : भवानी पेठेतील स्वरुप गणेश ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मिळाला़ डॉ़ उज्ज्वला देवधर यांनी मार्गदर्शन केल़े यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयहरी साखरे, बाबासाहेब कुलकर्णी, नरसिंग चव्हाण, निवृत्ती व्हटकर, राजगोपाल काबरा, शंकरराव पतंगे, डॉ़ सुभाष गोविंदे, शिवशंकर पाटील उपस्थित होत़े युवा कौशल्य केंद्रातर्फे पीसीबी वर्कशॉप सोलापूर : युवा विकास कौशल्य केंद्राच्या वतीने जिल्?ातील तांत्रिक व अभियांत्रिकी महाविद्यालयात डिप्लोमा व बीईच्या ईएनटीसी तुकडीतील विद्यार्थ्यांसाठी पीसीबी डिझाईन स्क्रिनिंग, पीसीबी प्लेट इंचिंग करणे, ड्रीलिंग, कटींग करणे अशा अनेक बाबी शिकवणार आहेत़ गुरुवार पेठेत नीलकंठेश्वर मंदिरात 28 ते 30 डिसेंबर दरम्यान सकाळी 11 ते 3 वेळेत वर्कशॉप होत आह़ेउस्मानिया उर्दू हायस्कूलमध्ये पैगंबर जयंती सोलापूर : होटगी स्टेशन येथील उस्मानिया उर्दू हायस्कूलमध्ये पैगंबर जयंती आणि गणित दिवस साजरा करण्यात आला़ यावेळी संस्थेचे सचिव तरन्नुम खाटिक, मुख्याध्यापक शोएब बलोलखान, एफ़ ए़ शेख, एस़ ए़ हरणमारे, इम्रान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी मुख्याध्यापक बलोलखान यांनी मार्गदर्शनातून गणित दिवसाची पार्श्वभूमी स्पष्ट केली़ विद्यार्थ्यांनी टाळ्यांनी दाद दिली़ संगमेश्वर महाविद्यालयात भूगोल विद्यार्थ्यांचा मेळावा सोलापूर : संगमेश्वर महाविद्यालयात भूगोल विषयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला़ डॉ़ डी़ एस़ हरवाळकर यांनी आपले अनुभव कथन केल़े यावेळी प्रा़ डॉ़ एस़ एस़ आडवीतोट, प्रा़ डॉ़ एस़ एम़ मुलाणी, बी़ आऱ फुले, प्रा़ कोणदे, डॉ़ डी़ डी़ पुजारी, सोशल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ़ के.एम़ जमादार, प्राचार्य डॉ़ बी़ एम़ भांजे, प्राचार्य डॉ़ डी़ डी़ पुजारी उपस्थित होत़े प्रोग्रेसिव्हमध्ये गणित दिवस साजरासोलापूर : दक्षिण सदर बझार येथील दि प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये र्शीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस हा गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महेबूब सय्यद होत़े प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक जावेद उस्ताद होत़े त्यांनी गणित दिवसाचे महत्त्व सांगितल़े यावेळी पर्यवेक्षक ए़ ए़ मुल्ला, महेजबीन उस्ताद यांच्यासह शिक्षक उपस्थित होत़े