शाळेच्या आवारात आढळला नाग
By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:21+5:302015-09-01T21:38:21+5:30
(फोटो)
Next
(फ ोटो)वर्गखोलीत आढळला नागसर्पमित्रांनी दिले जीवदान : भिवापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार भिवापूर : मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. विद्यार्थी वर्गखोलीत बसल्यानंतर शिक्षकाने त्यांना शिकवायला सुरुवात केली. काही वेळात खोलीत अनोळखी आवाज यायला सुरुवात झाली. बघतात तर काय, शिक्षकाच्या शेजारी असलेल्या टेबलच्या खाली भला मोठा नाग गुंडाळी घालून बसला होता. शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित खोलीबाहेर काढून सर्पमित्राच्या मदतीने त्या नागाला पकडले. हा प्रसंग अनुभवला भिवापूर येथील दिघोरा भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकाने!मुख्याध्यापक रामराव टोंग हे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिकवित होते. अचानक सापाचा फुत्कार सर्वांनाच ऐकायला आला. तपासणी केली असता, टोंग यांच्या शेजारी असलेल्या टेबलखाली नाग गुंडाळी घालून बसला असल्याचे सर्वांच्यास निदर्शनास आले. नागाला पाहून विद्यार्थ्यांमध्ये घबराहट निर्माण होणे स्वाभाविक होते. त्यातच टोंग यांनी समयसूचकता बाळगत सर्व विद्यार्थ्यांनाा आधी सुरक्षित खोलीबाहेर काढले. तोवर परिसरातील नागरिकही शाळेत पोहोचले. त्यांनी सापाला मारण्याचा विचार व्यक्त केला. शिक्षकांनी लगेच या नागाची माहिती सर्पमित्र प्रकाश मांढरे याला दिली. प्रकाशने शाळा गाठून त्या नागाला मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेतले. एवढेच नव्हे तर त्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या मानातील सापाविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी विस्तृत माहिती दिली. सापापासून स्वत:चा बचाव करण्याचे उपायदेखील सांगितले. माहिती मिळताच खंडविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र वराडे, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. कविता मोरे आदी मंडळी शाळेच्या आवारात दाखल झाली होती. त्यानंतर या नागाला वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)---कोट---सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. या काळात सापांचा मुक्तसंचार असतो. दिघोरा येथील शाळेत नाग आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. मुख्याध्यापक टोंग व सर्पमित्र प्रकाश मांढरे यांच्या समयसूचकतेमूळे अप्रिय घटना घडली नाही. शिवाय, त्या नागाला जीवनदान मिळाले. असा प्रकार तालुक्यातील इतर शाळांमध्ये होऊ नये यासाठी सर्व शाळांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, सर्पमित्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक कळविले आहेत. - मनोहर बारापात्रेखंडविकास अधिकारी, भिवापूर***