विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे
By admin | Published: July 10, 2015 09:26 PM2015-07-10T21:26:50+5:302015-07-10T21:26:50+5:30
कुणबी महासंघाच्या गुणवंत सोहळ्यात अमिता चव्हाण यांचे प्रतिपादन
Next
क णबी महासंघाच्या गुणवंत सोहळ्यात अमिता चव्हाण यांचे प्रतिपादननांदेड : दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी विशिष्ट शाखेतच प्रवेश घ्यावा, असा आग्रह पालकांनी न धरता त्यांच्या इच्छा व आवडीनुसार शिक्षणाचे क्षेत्र निवडू दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येईल, असे प्रतिपदान आ.अमिता चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्यावतीने कुसुम सभागृह येथे १० जुलै रोजी आयोजित दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून आ.अमिता चव्हाण बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डी.पी.सावंत, शारदा भवन शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र चव्हाण, पत्रकार केशव घोणसे पाटील, उद्योजक बालाजीराव जाधव, प्रदेशाध्यक्ष गिरिष जाधव, मंगलाताई धुळेकर, नगरसेविका ललिता शिंदे, कृषीभूषण रामराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ.चव्हाण म्हणाल्या, आजच्या युगात विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी अमूक प्रकारच्याच शाखेत प्रवेश घ्यावा असा पालकांचा आग्रह असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा नसतांना प्रवेश घेतलेल्या क्षेत्रात त्यांना यश मिळविणे अवघड जाते, यासाठी पालकांनी समजून घेवून त्यांच्या आवडीनुसार शाखेत प्रवेश दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. मार्गदर्शन करतांना, आ.डी.पी.सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी असून त्यांनी ध्येय डोळ्यासमोर घेवून चालावे, तरच शिक्षणात प्रगती होईल. नरेंद्र चव्हाण म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे असेल तर संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना सायन्स, कॉमर्स, सीए, टॅक्स कन्सल्टट, आयटीआय आदी क्षेत्रात आपले करीअर करण्याची संधी असून त्यांनी अधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे असे आवाहन केले. कार्यक्रमात १५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला. मंचावर कार्याध्यक्ष संतोष मुळे, संजय कदम, राजेश बेंबरे, आर.बी.काकडे, माधव कदम, सुखदेव जाधव, जिल्हाध्यक्ष देविदास मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रत्नमाला व्यवहारे, नारायणराव पवार, छ.शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन कहाळेकर, सुनंदा इंगळे, ललिता पाटील, आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ॲड.दिगंबर देशमुख व भाग्यश्री कदम यांनी तर आभार सुखदेव जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी संतोष कोसमेटकर, सुजीत लहानकर, अशोक व्यवहारे, सुनील बिजलगावे, नामदेव जाधव, आनंद किरकण, सुनील लुंगारे, गजान चव्हाण, पिंटू लोमटे आदींनी परिश्रम घेतले.