वैश्विक साहित्याचा अभ्यास काळाची गरज: दिड्डी

By Admin | Published: December 20, 2015 11:59 PM2015-12-20T23:59:58+5:302015-12-20T23:59:58+5:30

सोलापूर:

Study of global literature needs time: Diddi | वैश्विक साहित्याचा अभ्यास काळाची गरज: दिड्डी

वैश्विक साहित्याचा अभ्यास काळाची गरज: दिड्डी

googlenewsNext
लापूर:
जागतिकीकरणाच्या काळात वैश्विक साहित्याचा अभ्यास काळाची गरज आहे. जागतिक साहित्याच्या अभ्यासाने आपली दृष्टी व्यापक होते, असे प्रतिपादन पांडुरंग दिड्डी यांनी केले.
ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय व सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा बी.ए. भाग 3 च्या लिटरेचर इन इंग्लिश या अभ्यासक्रमावर आधारित होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजेंद्र शेंडगे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विश्व साहित्याच्या अभ्यासामुळे तत्कालीन संस्कृतीचे आकलन होते व जगातील र्शेष्ठ साहित्यकृतींचा, साहित्यकारांचा परिचय होतो, असे प्रतिपादन केले. कार्यशाळेत ज्यांनी शोधनिबंध दिले होते त्यांची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अँनी जॉन यांनी केले. ही कार्यशाळा चार सत्रांत घेण्यात आली. जागतिक कादंबरी, नाटक व कथा यांचा विचार यावेळी करण्यात आला.
प्रथम सत्रात डॉ. दीपक ननवरे यांनी कादंबरी ‘ए गेस्ट ऑफ ऑनर बाय नादिनी गॉर्डिमर’ याविषयी विवेचन केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. अशोक कदम यांनी भूषविले. दुसर्‍या सत्रात डॉ. रमेश इंगळे यांनी ‘ड्रामा इनंइगामे बाय सॅम्युअल बेकेट’ या विषयावर विवेचन केले. या सत्राचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. एन. बी. पवार होते. तिसरे सत्र डॉ. संतोष कोटी यांचे ‘शॉर्ट स्टोरीज’ या विषयावर विवेचन झाले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. अर्जुन धोत्रे यांनी भूषवले. शेवटचे सत्र समारोपाचे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पी. एस. कुलकर्णी तर अध्यक्ष डॉ. टी. एन. कोलेकर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. आर. वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. प्राजक्ता जोशी यांनी मानले. या कार्यशाळेत सोलापूर जिल्?ातील विविध महाविद्यालयांतील दीडशेहून अधिक प्राध्यापक व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)

Web Title: Study of global literature needs time: Diddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.