सारांश- शिक्षण जगत

By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30

पुणे : एसएनबीपी स्कुल व ज्युनियर कॉलेज येरवडा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी क्रीडाविषयक लेखक प्रा. संजय पांडुरंग दुधाणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी कसे परिश्रम घ्यावे लागतील याचा विविध खेळाडूंच्या जीवनातील प्रसंग सांगून प्रोत्साहित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक ज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यालयामध्ये प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एस. ई. सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले,उपप्राचार्या रेजिना रॉड्रीक्स, क्रीडा प्रमुख फिरोज, उपप्राचार्य अमित खराडे आदी उपस्थित होते.

Summary- The world of education | सारांश- शिक्षण जगत

सारांश- शिक्षण जगत

Next
णे : एसएनबीपी स्कुल व ज्युनियर कॉलेज येरवडा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी क्रीडाविषयक लेखक प्रा. संजय पांडुरंग दुधाणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी कसे परिश्रम घ्यावे लागतील याचा विविध खेळाडूंच्या जीवनातील प्रसंग सांगून प्रोत्साहित केले. तसेच विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक ज्ञानाला चालना देण्यासाठी विद्यालयामध्ये प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एस. ई. सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले,उपप्राचार्या रेजिना रॉड्रीक्स, क्रीडा प्रमुख फिरोज, उपप्राचार्य अमित खराडे आदी उपस्थित होते.
................
सैनिकांना राख्या व भेटकार्ड
पुणे : प्राणांची बाजी लावून सीमेचे रक्षण करणार्‍या ३०० सैनिकांना माईर्स एमआयटीच्या श्री शारदा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त केली. तसेच प्रत्येक सैनिकास स्वत: बनवलेले भेटकार्ड दिले. बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपचे सुभेदार मेजर महावीर प्रसाद, सुभेदार रनबीरसिंग, संस्थेचे अधिष्ठाता शरदचंद्र दराडे पाटील, मुख्याध्यापिका जयश्री घारपुरे यांनी मार्गदर्शत केले.
...........
वैद्यकिय तपासणी
पुणे : कात्रज येथील हुजूरपागा शाळेतील छोट्या गटातील मुलींसाठी अपूर्वा सामाजिक प्रतिष्ठान तर्फे वैद्यकिय शिबीर आयोजित केले होते. ३६६ मुलींची तपासणी करण्यात आली. तपासणी डॉ. संजय सुर्यवंशी, डॉ. प्रणिता राऊत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सुहास शितोळे यांनी केली. डॉ. शितोळे यांनी मुलांच्या असमातोल आहार व्यायामाचा अभाव, मोबाईलमुळे होणार्‍या डोळ्यांचे विकार, लघवी-शीच्या तक्रारींवर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका उमा गोसावी व शिक्षक उपस्थित होते.
.................

शिक्षकांसाठी नाट्यप्रशिक्षण कार्यशाळा
पुणे : जिल्हा परिषद पुणे आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने एकदिवसीय नाट्यप्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. माईर्स श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात ही कार्यशाळा झाली. उदघाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिका शोभा शिंपी, नाट्यस्पर्धा समितीचे कार्याध्यक्ष हनुमंत कुबडे, तज्ज्ञमार्गदर्शक गिरीश भुतकर, प्रकाश खोत उपस्थित होते. कार्यशाळेत रंगमंचीय खेळ, अभिनय, दिग्दर्शन, संहिता लेखन याबद्दल प्रशिक्षणार्थींना सप्रयोग मागदर्शन केले.सूत्रसंचालन जयंत पाठक यांनी केले.

Web Title: Summary- The world of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.