जिल्ातील १३ हजार मुले करताहेत शाळाबा विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण
By Admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:43+5:302016-01-24T22:19:43+5:30
जळगाव : जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळाबा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हभरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) १३ हजार ८०० स्वयंसेवक जिल्हाभरात शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करत आहे.
ज गाव : जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार शाळाबा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हभरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) १३ हजार ८०० स्वयंसेवक जिल्हाभरात शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करत आहे. गेल्यावर्षी शाळाबा विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षकांवर ताण येत होता. त्यापार्श्वभूमीवर यंदा हेच सर्वेक्षण सेवाभावी संस्था किंवा शालेयस्तरावर पर्यायी मार्ग शोधून करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार जि.प. प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या आवाहनानुसार या सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणार्या स्वयंसेवकाची निवड करण्यात आली आहे. याबाबत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे जिल्हाभरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या एन.एस.एस. युनिटच्या प्रमुखांना कळविण्यात आले आहे. स्वयंसेवक ज्या ठिकाणी राहत असतील, त्याच परिसरात किंवा गावात त्यांनी सर्वेक्षण करावा. ते पूर्ण झाल्यानंतर अहवाल तयार करून तो प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करावा. वयोवर्ष पाच किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेला मुलगा किंवा मुलगी शाळेत जात नसल्याचे आढळून आल्यास संबंधितांचे त्याच दिवशी प्रवेश अर्ज भरून नोंदणी करून घ्यावी, असे आदेश एन.एस.एसच्या. विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. ३१ जानेवारीपर्यंत चालणार सर्वेक्षण जिल्ात शाळाबा विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. १ फेब्रुवारीला जिल्ात शाळाबा विद्यार्थी किती? याची आकडेवारी प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त होणार आहे.