शुल्कवाढीविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

By admin | Published: February 13, 2015 11:11 PM2015-02-13T23:11:15+5:302015-02-13T23:11:15+5:30

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कवाढीविरोधात शुक्रवारी विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन कुलगुरुंच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शुल्कवाढीच्या विषयावर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिले.

Suspended the movement of students against the hike in fees | शुल्कवाढीविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

शुल्कवाढीविरोधातील विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

Next
णे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कवाढीविरोधात शुक्रवारी विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन कुलगुरुंच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शुल्कवाढीच्या विषयावर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिले.
विद्यापीठाने बहिस्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कात वाढ केली आहे. याविरोधात युगंधर युवा प्रतिष्ठान व पदवीधर विकास मंचाकडून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलन सुरू होते. कुलगुरू डॉ.गाडे यांनी शुक्रवारी स्वत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांची बाजू समजून घेतली. तसेच येत्या व्यवस्थापन परिषदेत या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे मंचचे प्रा.विजय शेटे यांनी सांगितले.
विद्यापीठाकडून नियमित व बहि:स्थ विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठीच्या सक्तीमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. फोटोकॉपीसाठी एका विद्याथ्यार्ला ८०० रुपये मोजावे लागतात. तसेच बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेशशुल्कात वाढ करून ५४०० रुपये करण्यात आले आहेत. या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात पुणेव्यतिरिक्त नगर आणि नाशिक विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संतोष ढोरे यांनीही या आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला.
--------------

Web Title: Suspended the movement of students against the hike in fees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.