कन्नड शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत उपोषण स्थगित : फाईल सीईओंकडे कार्यवाहीसाठी सादर
By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:47+5:302015-09-04T22:45:47+5:30
सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़
Next
स लापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़ राज्य शासनाने किंवा शिक्षण उपसंचालकांनी जिल्हा परिषदेच्या अधिनस्थ असलेल्या उर्दू खासगी प्राथमिक शाळेतील उर्दू, मराठी आणि कन्नड माध्यमांच्या शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळात समायोजन करण्याचे आदेश दिले आहेत़ सोलापूर जिल्हा परिषदेतील ३८ शिक्षकांचे समायोजन रेंगाळले आहे़ डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी याकडे लक्ष वेधले़ या शिक्षकांचे तातडीने समायोजन झाले नाही तर शिक्षक दिनी चक्री उपोषणाचा इशारा दिला होता़ शिक्षण विभागाने संघटनेच्या मागणीची दखल घेतली़ उर्दू माध्यमाच्या ७ शिक्षकांचे आणि क न्नड माध्यमाच्या एका शिक्षकाचे नगरपालिकेच्या शाळांमध्ये तातडीने समायोजन करण्यात आले आहे़ उर्वरित शिक्षकांपैकी कन्नड माध्यमाच्या १६ शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे़ सीईओ अरुण डोंगरे यांच्याकडे हा प्रस्ताव दिल्याने त्यावर निर्णय अपेक्षित आहे़ मराठी माध्यमाच्या शिक्षकांचे खासगी शाळांमध्ये समायोजन होऊ शकते़ शिक्षण विभागाने ही वस्तुस्थिती लेखी स्वरुपात संघटनेक डे मांडली आहे़ त्यामुळे शिक्षक दिनी उपोषणाचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)