जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालय प्रथम

By Admin | Published: January 22, 2016 10:41 PM2016-01-22T22:41:38+5:302016-01-22T22:55:26+5:30

सर्वतीर्थ टाकेद : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालयाला प्रथम क्र मांक मिळाला.

Taked Vidyalaya first in district level science exhibition | जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालय प्रथम

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालय प्रथम

googlenewsNext

सर्वतीर्थ टाकेद : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात टाकेद विद्यालयाला प्रथम क्र मांक मिळाला.
नाशिक जिल्हा विज्ञान अध्यापक संघ, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग व संदीप फाउण्डेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती किरण थोरे, समाज कल्याण सभापती उषा बच्छाव, शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, उपशिक्षणाधिकारी सुनीता धनगर, राजेंद्र सावंत, नरेंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष सदाशिव भामरे, के.के. पवार, संजय चव्हाण, जिल्हा विज्ञान संघटनेचे के.के. अहिरे, के.डी. मोरे उपस्थित होते. या वेळी एकूण १९२ प्रकल्प मांडण्यात आले होते. यापैकी शैक्षणिक साहित्य (माध्यमिक गट) प्रथम क्र मांक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेज टाकेद येथील शिक्षक प्रा.अमोल लक्ष्मण भालेराव, द्वितीय जनता विद्यालय डुबेरे शिक्षक कर्पे, तृतीय माध्यमिक विद्यालय येवला शिक्षक रतन दराडे.
प्राथमिक गट- प्रथम वैनतेय विद्यालय, निफाड- शिक्षक गोरख सानप, द्वितीय जिल्हा परिषद शाळा, शेनवड- शिक्षक सुनील धोंगडे, तृतीय जिल्हा परिषद, शाळा पिंप्री सय्यद- शिक्षिका सुनीता देवरे.
उपकरणमध्ये प्रथम क्र मांक ( माध्यमिक गट )जनता विद्यालय मातोरी, द्वितीय माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव ता.ईगतपुरी शिक्षक नायकुडी, तृतीय माध्यमिक विद्यालय बाघदर्डी, उत्तेजनार्थ न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव. बावा व्ही.बी.
आदिवासी गटातून प्रथम सह्याद्री माध्यमिक विद्यालय आंबेवाडी ता.ईगतपुरी.
उपकरण ( प्राथमिक गट ) प्रथम जनता विद्यालय अस्वली ता.ईगतपुरी शिक्षक कुमावत द्वितीय रचना विद्यालय नाशिक शरणपूररोड
आदिवासी गटातून प्रथम जिल्हा परिषदशाळा गळोशी वानखेडे.
लोकसंख्या शिक्षण .(माध्यमिक गट) प्रथम मा.वि.भेंडाळी ता.निफाड ( भदाणे बी.एम.)द्वितीय मा.वि.चांदवड ( संजय खैरे )तृतीय जिजामाता विद्यालय सटाणा ( वाघ सी.ए.) प्राथमिक गट जि.प.शाळा धामणगाव ता.ईगतपुरी ( के.व्ही.कदम.)द्वितीय प्राथमिक शाळा इंदिरानगर नाशिक ( कल्पना चव्हाण )तृतिय जि.प.शाळा.मोरेनगर बागलाण ( वैषाली सुर्यवंशी )
प्रयोग शाळा परिचर गटातून खैरे विद्यालय .संजय वाघ.द्वितीय जुनेद कलीम मुजरकरम मालेगाव.तृतीय मा.आश्रम शाळा सटाना सुरेश गांगुर्डे.
व्यवसाय शिक्षण विभाग.प्रथम जनता विद्यालय नांदगाव ( आहेर सुनिल वसंत ) द्वितीय एम.व्ही.पिंपरखेड ता.दिंडोरी ( वाणी ) तृतीय देवळाली कँप.हायस्कूल ( बैरागी ) यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली.

Web Title: Taked Vidyalaya first in district level science exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.