शिक्षक दिनावर बहिष्कार काळ्या फिती लावून काम करणार शिक्षक
By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:49+5:302015-09-04T22:45:49+5:30
शिक्षक दिनावर बहिष्कार
Next
श क्षक दिनावर बहिष्कारकाळ्या फिती लावून काम करणार शिक्षकमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व महामंडळाने ५ सप्टेंबर या शिक्षण दिनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकदिनी शिक्षक काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेने सांगितले.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक राज्य सरकारने २८ ऑगस्ट रोजी काढलेल्या अध्यादेशाची शिक्षकदिनी होळी करणार आहेत. शिवाय संपूर्ण दिवस उपवास करून सरकारचा निषेध व्यक्त केला जाईल, असेही संघटनेने सांगितले. दरम्यान, राज्यभर होणार्या निदर्शने, उपोषण आणि आंदोलनांना मुख्याध्यापक संघटना पाठिंबा देतील, असे प्रशांत रेडीज यांनी सांगितले.२८ ऑगस्टच्या शासन निर्णयाविरोधात शिक्षक आमदार कपिल पाटील शिक्षकदिनी परळच्या कामगार मैदानावर सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषणास बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समितीने या उपोषणास पाठिंबा दिला आहे. शासनाच्या निर्णयाने अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना फटका बसणार असल्याच समितीचा आरोप आहे. परिणामी शासनाने निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.....................