शिक्षक परिषदेचे मंगळवारी धरणे आंदोलन शाळा आणि शिक्षकांचे प्रश्न : रामनाथ मोते यांचा पुढाकार
By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:08+5:302015-07-12T21:58:08+5:30
सोलापूर :
Next
स लापूर : राज्यातील विनाअनुदानित शाळा आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मंगळवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे़ आ़ रामनाथ मोते, आ़ ना़ गो़ गाणार हे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत़ विनाअनुदानित शाळांचे मूल्यांकन करुन त्यांना तातडीने अनुदान देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या आमदारांनी शासनाकडे लावून धरली आहे़ आ़ रामनाथ मोते यांनी तर या प्रश्नांसाठी मंत्रालयावरुन उडी मारण्याचा इशारा दिला होता़ शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांनी यासंदर्भात आ़ मोते यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली़ त्यांना विनाअनुदान शाळेचे प्रश्न मांडत २३ मागण्यांचे निवेदन सादर केले़ प्रलंबित प्रश्नांचा विचार केला नाही तर १४ जुलै रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता़ मंगळवारी सकाळी आझाद मैदानावर शिक्षक परिषद धरणे आंदोलन करणार आहे़ आ़ रामनाथ मोते, आ़ ना़ गो़ गाणार, राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, प्रांत सदस्य बाबासाहेब काळे आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती पुणे विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र पवार यांनी दिली़ (प्रतिनिधी)या आहेत मागण्या़़़* मूल्यांकन करुन पात्र शाळा, तुकड्यांना अनुदान द्या़ * संचमान्यता तातडीने द्या, अतिरिक्त शिक्षक सामावून घ्या़ * २००५ नंतरच्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा़* शालेय क र्मचार्यांचे वेतन १ तारखेला नियमित करा़ * वरिष्ठ, निवड श्रेणीच्या जाचक अटी रद्द करा़ * शिक्षक भरतीवरील बंदी उठवा़ * अनुकंपा तत्वावर वारसांना सेवेची संधी द्या़ * शिक्षक, शिक्षकेतरांच्या पाल्यांना सर्वच स्तरावर मोफत शिक्षण द्या़