शिक्षक ऑनलाईन तर विद्यार्थी वार्यावर जामनेर : सरल डाटाबेस प्रणाली ठरतेय डोकेदुखी
By admin | Published: August 13, 2015 10:34 PM2015-08-13T22:34:37+5:302015-08-13T22:34:37+5:30
जामनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे.
Next
ज मनेर : राज्याच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढून त्याद्वारे विद्यार्थ्यांची इत्यंभूत माहिती संगणकावर भरून द्यायची असल्याने सर्वच शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक तासनतास संगणकावर बसू लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान संभवते. त्यामुळे हे काम एखाद्या खाजगी संस्थेकडे देऊन किंवा दुसरी यंत्रणा राबवून ही योजना पूर्ण करण्यात यावी अशी मागणी आता पालक, शिक्षकांकडून पुढे येऊ लागली आहे. राज्य शासनाच्या सरल डाटाबेस प्रणालीअंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या इत्यंभूत माहितीमध्ये रक्तगटापासून ते आईवडिलांच्या बाबतीतील सर्व माहिती गोळा करून ती संगणकामध्ये भरावी असा हा आदेश आहे. ही सर्व माहिती गोळा करताना शिक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडत आहे. आधीच प्रत्येक शाळांमध्ये शालेय पोषण आहारांतर्गत मध्यान्ह भोजन, मुल्यांकनाची जबाबदारी यासह अनेक कामे शिक्षकांना ज्ञानार्जन करून करावी लागतात. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी इतर कामातच दिवसभर व्यस्त राहावे लागते. याचा विपरीत परिणाम हळूहळू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या शिक्षणावर होऊ लागल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात अडचणीयावर कडी म्हणजे विद्यार्थ्यांची, त्यांच्या पालकांची आवश्यक माहिती गोळा करण्यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालकवर्गही आपली आणि आपल्या पाल्यांची माहिती देण्यासाठी मागे-पुढे करतात याचा फटका वेळेत माहिती न मिळण्यात होत आहे. ऑनलाईन प्रणाली असल्याने अनेकदा संगणकावर संबंधित साईटच उघडली जात नाही, याचाही परिणाम माहिती देण्यावर होतो आहे. अशा अनेक तक्रारींचा पाढा सध्या सर्वच शाळांच्या शिक्षकवर्गाकडून पुढे येऊ लागला आहे. राज्य शासनाच्या व शिक्षण विभागाचा आदेश असल्याने मागितली ती सर्व माहिती देणे आमच्यावर बंधनकारक असले तरी दुसरीकडे मात्र संगणकाचीही बरीच मर्यादा असल्याने तासंनतास साईटच ओपन होत नाही. त्यामुळे या कामाला जास्त वेळ लागत आहे. तरीही घाबरून जाण्याचे कारण नाही. शिवाय शासनाने माहिती देण्यासाठीची वेळ मर्यादा वाढवून दिल्यास योग्य ठरेल.- सुमित अहिरेगटशिक्षणाधिकारी, जामनेर