शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलिकडील इतिहास शिकवावा - भालचंद्र नेमाडे
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:07+5:302015-02-14T23:52:07+5:30
शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलिकडील इतिहास शिकवावा - भालचंद्र नेमाडे
Next
श क्षकांनी पाठ्यपुस्तकापलिकडील इतिहास शिकवावा - भालचंद्र नेमाडेमुंबई :विद्यार्थ्यांना ज्या पुस्तकांतून शिकवले जाते, ती पुस्तके चुकीच्या लोकांनी लिहली आहेत. त्यामुळे मुलंाना चुकीचा इतिहास शिकविला जात असल्याने शिक्षकांनी पाठ्यपुस्तकापलीकडे जाऊन संस्कृती, इतिहास शिकवावा, असे सल्ला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी शिक्षकांना दिला.पाचवे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात शनिवारी पार पडले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री, गायिका फैयाज यांचा हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ समीक्षक मधु पाटील यांच्याहस्ते भालचंद्र नेमाडे यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाध्यक्ष संभाजी भगत, शिक्षण विभागाचे सहसचिव प्रकाश ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.संस्कृती शिखरावर नाही, तळात घडते. गाळात उगवते. शिखरावर बर्फ असतो ऑक्सिजन नसतो. लेखकापेक्षा मी शिक्षक असल्याचा मला जास्त अभिमान असल्याचे, उद्गार यावेळी नेमाडे यांनी काढले. सध्या फक्त शिक्षकच नीट काम करतात. शिक्षकाची परंपरा उज्ज्वल असून ही परंपरा त्यांनी टिकवून ठेवली पाहिजे. त्यांनी राजकारणात पडू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना दिला. शिक्षकांना सन्मान मिळत नाही, अशा समाजात राहण्याची मला लाज वाटते, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.पालकांमध्ये वाढत असलेल्या इंग्रजी प्रेमावर त्यांनी टीका केली. ज्यांना मातृभाषा येत नाही, तो व्यक्ती कधीही पुढे गेलेला नाही. पालकांच्या इंग्रजी पोटी असणार्या अंधश्रध्देमुळे भाषेची दुरावस्था झालेली आहे. खरा महाराष्ट्र धर्म काय आहे, हे मुलांना कळू द्या, इंग्रजी ही कामापुरती असू द्या असे स्पष्ट करत त्यांनी शिक्षण हे मातृभाषेतच झाले पाहिजे, असे सांगितले.यावेळी बोलताना प्रख्यात गीतकार जावेद अख्तर म्हणाले की, शिक्षण हा सर्वात महत्वाचा विभाग असतानाही त्यासाठी देशात स्वतंत्र खाते नाही. शिक्षकांना सन्मान मिळत नाही. १0 लाखाच्या गाडीतून विद्यार्थी शाळेत येतो आणि शिक्षक बसमधून उतरतो, अशी वितरित परिस्थिती सध्या असल्याचे ते म्हणाले.