ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2016 12:45 AM2016-05-04T00:45:17+5:302016-05-04T00:45:17+5:30
ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आहे, असे मला वाटत नाही. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे काही नाही. इथे दाढी सोडून काहीही नाही, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण
Next
म ख्यमंत्र्यांचा सल्ला : पर्वरीत सचिवालयासमोर निदर्शने पणजी : सरकारने आपल्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून दीड महिन्याहून अधिक काळ आझाद मैदानावर धरणे धरलेल्या पॅरा शिक्षिकांनी मंगळवारी पर्वरी येथील सचिवालयासमोर धरणे आंदोलन केले. शिक्षिकांनी सरकारविरोधात निदर्शने केल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शिक्षिकांना बोलावून आंदोलन मागे घेऊन तुमच्या मागण्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करा, अशी सूचना केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने शिक्षिकांनी बुधवारपासून सचिवालयासमोरच आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीत कायम करावे म्हणून पॅरा शिक्षिकांनी दीड महिन्याहून अधिक काळ आझाद मैदानावर आंदोलन केले. मात्र, सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. मंगळवारी शिक्षिकांनी पर्वरी सचिवालयासमोर निदर्शने केल्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी शिक्षिकांना चर्चेसाठी बोलावले. तुम्ही आंदोलन न करता तुमच्या मागण्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा करा, अशी सूचना केली. मात्र, शिक्षिकांना कोणतेही ठोस आश्वासन देणे मुख्यमंत्र्यांनी टाळले. तथापि, आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका शिक्षिकांनी घेतली आहे. बुधवारपासून आझाद मैदानावर न बसता पर्वरी सचिवालय संकुलासमोरच धरणे आंदोलनाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षिकांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)