फिरत्या उर्दू लायब्ररीत दुर्मीळ पुस्तके तीन हजार विद्यार्थ्यांची भेट : केंद्र सरकारचा उपक्रम

By Admin | Published: October 13, 2015 08:51 PM2015-10-13T20:51:05+5:302015-10-13T21:01:30+5:30

जळगाव- आतापर्यंत महानगरे व मुस्लीम बहुल भागात फिरणारी उर्दू लायब्ररी शहरात प्रथमच आली आहे. एका भल्या मोठा चारचाकी वाहनात असलेल्या या लायब्ररीस शहरातील उर्दू संस्थांमधील व इतर शाळांच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे.

Three thousand students visit rare books in the moving Urdu library: Central Government initiative | फिरत्या उर्दू लायब्ररीत दुर्मीळ पुस्तके तीन हजार विद्यार्थ्यांची भेट : केंद्र सरकारचा उपक्रम

फिरत्या उर्दू लायब्ररीत दुर्मीळ पुस्तके तीन हजार विद्यार्थ्यांची भेट : केंद्र सरकारचा उपक्रम

googlenewsNext

जळगाव- आतापर्यंत महानगरे व मुस्लीम बहुल भागात फिरणारी उर्दू लायब्ररी शहरात प्रथमच आली आहे. एका भल्या मोठा चारचाकी वाहनात असलेल्या या लायब्ररीस शहरातील उर्दू संस्थांमधील व इतर शाळांच्या सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे.
मेहरूणमधील एच.जे.थीम महाविद्यालयात ही लायब्ररी सोमवारी आली. येत्या १४ तारखेपर्यंत ती या महाविद्यालयात असणार आहे.
केंद्र सरकारचा मानव संसाधन विभाग आणि कौमी काउंसील फरोगे उर्दू जबान, नवी दिल्ली यांच्यातर्फे या फिरत्या उर्दू पुस्तकांच्या लायब्ररीचा उपक्रम राबविला जात आहे.

६० हजार पुस्तके
वाहनात ६० हजार पुस्तके आहेत. शहरात कुठल्याही दुकानावर न मिळणारी उर्दू भाषेतील भारतीय राज्यघटना, भारत के आझादी की कहानी व इतर थोर पुरुषांच्या आत्मचरित्राबाबतची पुस्तके या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत. डॉ.अब्दुल कलाम यांचे विंग ऑफ द फायर हे पुस्तकही उर्दूमध्ये उपलब्ध आहे. अनेक दुर्मीळ पुस्तके उपलब्ध असल्याने त्यांच्या खरेदीसंबंधी प्रतिसादही मिळाला. २० ते ४० टक्के सूट पुस्तकांच्या खरेदीवर दिली जात आहे.

लायब्ररीचे स्वरुप
उर्दू पुस्तकांची लायब्ररी वाहनात आहे. तिला पारदर्शक काचा असून, बाहेरून सर्व पुस्तके दिसतात. या लायब्ररीत जाऊन ती पुस्तके पाहता येतात. विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी ती खुली करण्यात आली आहेत. सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही लायब्ररी पाहण्यासाठी खुली आहे.

तीन कर्मचारी
या लायब्ररीसोबत दिल्ली येथून चालक व त्याचा सहकारी आणि कौमी काउंसीलचे विक्री व्यवस्थापक सिद्धीक शेख हे आले आहे. त्यांचा मुक्काम सध्या इकरा महाविद्यालयातच असून, महाविद्यालय व्यवस्थापनाने त्यासंदर्भात व्यवस्था केली आहे.


शासनाच्या आवाहनास डॉ.इकबाल शहा यांचा प्रतिसाद
माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा अभियान राबविण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्याला प्रतिसाद देत इकरा संस्थेचे संचालक डॉ.इकबाल शहा यांनी २१०० रुपयांची पुस्तके खरेदी करून ती इकरा महाविद्यालयाच्या लायब्ररीस भेट दिली. तसेच डॉ.शहा यांनी प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेला, संस्थेला किमान एक पुस्तक खरेदी करून भेट द्यावे, असे आवाहन केले.

Web Title: Three thousand students visit rare books in the moving Urdu library: Central Government initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.