कल चाचणी परीक्षा
By admin | Published: February 8, 2016 10:54 PM2016-02-08T22:54:59+5:302016-02-08T22:54:59+5:30
Next
>कोट.........शिक्षण मंडळांकडून आजच कीट मिळाली आहे. त्यानुसार सायंकाळी उशिरापर्यंत या कीटचे वितरण सुरू होते. उद्यापासून ही परीक्षा शाळांमध्ये घेण्यात येईल. - विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग --------------कल चाचणी परीक्षा घेण्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची आहे. त्यामुळे शासनाच्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा होईलच. परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. - किशोर वायकोळे, विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षण विभागसर्वेक्षणात दिसून आलेला निष्कर्ष ० कल चाचणी परीक्षेचे अद्याप नियोजन झालेले नाही. ० काही शाळांमध्ये दहावीची पूर्व परीक्षा सुरू आहे. तर काही शाळेत विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. त्यामुळे ही परीक्षा झाल्यानंतर कल चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. ० दिवसभरात एका संगणकावर ही परीक्षा फक्त सहा वेळेस देता येणार आहे. याबाबत शिक्षकांना विचारले असता, त्यांनी माहिती नाही, असे म्हटले. ० कल चाचणी परीक्षेचे स्वरूप कसे राहील, याबाबत विद्यार्थ्यांना विचारले असता वर्ग शिक्षकांनी काहीही सांगितलेले नाही, असे विद्यार्थी म्हणाले. या परीक्षेत विद्यार्थ्यांना १५२ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार असून त्याची उत्तरे विद्यार्थ्यांना होय किंवा नाही, अशा स्वरूपात द्यावे लागणार आहे.