मस्ट बातमी -
By admin | Published: June 15, 2015 09:29 PM2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30
जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनतर्फे
Next
ज ाहरलाल दर्डा फाऊंडेशनतर्फेअभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीप्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना लाभ : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांचे स्वप्न साकारणार यवतमाळ : शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अभियांत्रिकी शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. शासनातर्फे काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षण त्यांच्या आवाक्यात येते. मात्र ही शासकीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक असते. उदा. जेईई परीक्षा. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अनेक विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही, किंवा आवश्यक कागदपत्रांची विहित मुदतीत पूर्तता करू शकत नाही. तर अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीच्या अटींची माहिती नसते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागते आणि त्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहते. परंतु आता जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि होतकरू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात येणार आहे. ही शिष्यवृत्ती ओपन, एससी, एसटी, व्हीजे, एनटी, एसबीसी, ओबीसी, ईबीसी, जैन, मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन, बौद्ध या सर्वांंसाठी उपलब्ध आहे. या संधीचा अधिकाधिक अभियांत्रिकी इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ्नाि4ल्ल3िं्रल्ल20151ी्िराों्र’.ूे या ईमेलवर किंवा 9730663068 या क्रमांकावर संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)