राज्यातील युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षण
By admin | Published: April 25, 2015 02:10 AM2015-04-25T02:10:39+5:302015-04-25T02:10:39+5:30
राज्यातील युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षण
Next
र ज्यातील युपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षणमुलाखतीच्या दहा सत्रांचे आयोजनमुंबई :युपीएससी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांसाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने दिल्लीत क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय दिल्लीच्या जुन्या महाराष्ट्र सदनात करण्यात आली असून येथे १ मे ते १ जून या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अभिरुप मुलाखतीच्या १0 सत्रांचे आयोजन केले आहे.युपीएससीमार्फत विविध पदांसाठी ऑगस्ट २०१४ मध्ये पूर्व परीक्षा तर डिसेंबर २०१४ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. १३ एप्रिल रोजी मुख्य परीक्षेचा निकाल घोषित झाला. या परीक्षेत ३ हजार ३०० विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या अंतिम टप्प्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील सुमारे २00 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुलाखतीचा हा टप्पा २७ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्यानुसार नवी दिल्ली येथील जुन्या महाराष्ट्र सदनात विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १ मे ते १ जून या कालावधीत महाराष्ट्र सदनामध्ये अभिरुप मुलाखतीच्या १० सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखतींचे सत्र प्रत्येक शनिवार आणि रविवार असणार आहे. यामध्ये तज्ञ्ज मार्गदर्शक, आजी-माजी सनदी अधिकारी, युपीएससीचे माजी सदस्य, वरिष्ठ पत्रकार सहभाग घेतील. अभिरुप मुलाखतींचे व्हिडियो रेकॉर्डिंग केले जाणार आहे. जुन्या महाराष्ट्र सदनात एकूण सात दिवस विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिरुप मुलाखत, युपीएससीच्या मुलाखत दिवसाच्या तीन दिवसापूर्वी व शारीरिक चाचणीसाठी तीन दिवस असे एकूण सात दिवस विद्यार्थ्याला येथे वास्तव्य करता येईल.या क्षमता विकास कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून अमरावती येथील शासकीय भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी तसेच निवासासाठी विद्यार्थ्यांना ०११-२३३८४२८९ व ०११-२३३८०३२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.