गरवारे संस्थेचा हवाई विद्यापीठाशी सामंजस्य करार

By Admin | Published: March 20, 2015 10:40 PM2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30

गरवारे संस्थेचा हवाई विद्यापीठाशी सामंजस्य करार

Treaty Agreement with Garware Institute of Hawai'i University | गरवारे संस्थेचा हवाई विद्यापीठाशी सामंजस्य करार

गरवारे संस्थेचा हवाई विद्यापीठाशी सामंजस्य करार

googlenewsNext
वारे संस्थेचा हवाई विद्यापीठाशी सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना कॅपिओलॉनी कम्युनिटी महाविद्यालयात करता येणार इंटर्नशिप
मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टीट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने शुक्रवारी हवाई विद्यापीठाच्या कॅपिओलॉनी कम्युनिटी महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला आहे. या करारान्वये गरवारे संस्थेत टुरीझम आणि ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट चा शिक्षणक्रम घेणार्‍या विद्यार्थ्यांना कॅपिओलॉनी कम्युनिटी महाविद्यालयात इंटर्नशिप करता येणार असून विविध सुविधांची देवाण घेवाण होणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणक्रमात देवाण घेवाण आणि या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी गरवारे इन्स्टीट्यूटने कॅपिओलॉनी महाविद्यालयाशी करार केला आहे. करारानुसार विद्यार्थ्यांना या दोन्ही संस्थेत शिकता येणार असून फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम,कोर्स मटेरियल, टेलेकॉन्फरंसिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे संस्थेत दोन वर्षाचा पूर्णवेळ टुरिझम अँड ट्रॅव्हल इंडस्ट्री मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम राबविला जात आहे. या अभ्यासक्रमासाठी गरवारे इन्स्टीट्यूटने सामंजस्य करार केला आहे.
दिवंसेदिवस पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असून पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी व्यवस्थापन क्षेत्रालाही मोठी मागणी येत असल्याचे दिसून येत आहे. भारतात तसेच परदेशात पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या व्यवसायामुळे सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कामाच्या संधी वाढत असल्याने गरवारे संस्थेने आधुनिक युगाच्या मागणीनुसार या अभ्यासक्रमात महत्वाचे बदल करत कॅपिओलॉनी कम्युनिटी महाविद्यालयाशी सामंसज्य करार केला आहे.

Web Title: Treaty Agreement with Garware Institute of Hawai'i University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.