एकाच दिवशी दोन परीक्षा
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM2015-07-29T00:42:19+5:302015-07-29T00:42:19+5:30
विद्यार्थी संभ्रमात : एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
Next
व द्यार्थी संभ्रमात : एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीपुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी)च्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले असून एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी, अशी त्यांची मागणी आहे.स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी एमपीएससीबरोबरच यूपीएससी, एसएससी तसेच इतर परीक्षांसाठी अर्ज करतात. त्यानुसार त्यांचा अभ्यासही सुरू होतो. पण अनेकदा एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या परीक्षा येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागले. ९ ऑगस्ट रोजी एमपीएससीची वनसेवा मुख्य परीक्षा होणार आहे. त्याच दिवशी एसएससीचीही परीक्षा आहे. या दोन्ही परीक्षांसाठी अनेक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पण एकाच दिवशी परीक्षा आल्याने ते गोंधळून गेले आहेत. एमपीएससीची परीक्षा मुंबईत होणार असून ती दोन सत्रात आहे. सकाळी १० ते १२ व दुपारी २ ते ४ या वेळेत ही परीक्षा होणार आहे. तर एसएससीचीही याच वेळेत आहे.