थोडक्यात -१

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:16+5:302015-02-18T00:13:16+5:30

चेअरमनपदी पत्रे

Typically -1 | थोडक्यात -१

थोडक्यात -१

Next
अरमनपदी पत्रे
बार्‍हाळी : सुगाव ता़ मुखेड येथील सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी उज्ज्वला पत्रे यांची बिनविरोध निवड झाली़ जानेवारीमध्ये निवडणूक पार पडली़ यात अरूण पत्रे यांच्या पॅनलने १३ पैकी १० जागा मिळविल्या होत्या़

विद्यार्थ्यांची तपासणी
फुलवळ : येथील श्री बसवेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी झाली़ यावेळी डॉ़व्ही़एऩजोगदंड यांनी तपासणी केली़ कार्यक्रमासाठी शिक्षक, कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले़

रस्त्याची दुरवस्था
बिलोली : सावळी-आरळी-कौठा-खपराळा हा रस्ता नादुरूस्त झाला आहे़ या संदर्भात नागरिकांनी तक्रारी देवूनही याकडे कोणाचेही लक्ष नाही़

मरखेल ठाण्याची तपासणी
देगलूर : येथील पोलिस ठाण्यची तपासणी पोलिस अधीक्षकांच्या पथकाने केली़ यानंतर पोलिस अधीक्षकांनी नागरिकांशी संपर्क केला़ यावेळी सपोनि प्रकाश राठोड, पप्पू रेड्डी, मच्छिंद्र गवाले, शंकरराव गवाले उपस्थित होते़

अध्यक्षपदी भरणे
किनवट : फुले-आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांची निवड झाली़ कार्यकारिणी अशी - उपाध्यक्ष मिलिंद सर्पे, सचिव बाबु भवरे, सहसचिव रवींद्र कांबळे, कोषाध्यक्ष गंगाधर मुनेश्वर, सहकोषाध्यक्ष शीलरत्न कांबळे, सल्लागार प्रशांत ठमके़

विद्यालयास ग्रंथसंपदा भेट
लोहा : चितळी येथील शरद पवार विद्यालयाला प्रदीप लोखंडे, सीमंतनी लोखंडे यांनी मोठी ग्रंथसंपदा भेट दिली़ यावेळी मु़अ़ बी़बीख़ांडेकर, बा़पुग़ायखर यांची उपस्थिती होती़

मुर्तीच्या छायाचित्राचे प्रकाशन
हिमायतनगर : श्री परमेश्वरच्या सुबक छायाचित्र असलेल्या कॅलेंडरचे मंदिर संस्थान संचालक मंडळाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले़ यावेळी महावीरचंद श्रीश्रीमाळ, लक्ष्मण शक्करगे, भास्कर दुसे, विठ्ठलराव वानखेडे, अनंता देवकत्ते, माधवराव पाळजकर, किशनराव मादसवार, देवीदास मुधोळकर, श्याम पवनेकर उपस्थित होते़

महर्षी कर्वे शाळेचे स्नेहसंमेलन
नांदेड : महर्षी धोंडो केशव कर्वे प्रा़शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन कुसुम सभागृहात झाले़ यावेळी संस्थेचे अध्यक्ष रंगनाथराव वाघ, सभापती सय्यदा फातेमा, मोहन जमदाडे, माधवराव बोकारे, गटशिक्षणाधिकारी सोने, कुलकर्णी, ॲड़सचिन वाघ, शिंदे उपस्थित होते़ एस़के़मोरे यांनी प्रास्ताविक केले़

गाळ काढण्यास प्रारंभ
इस्लापूर : नागाव ता़किनवट येथे नागरिकांच्या सहकार्यातून गाळ काढण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार शिवाजी राठोड यांच्या हस्ते झाले़ यावेळी सूर्यकांत ताडेवार, डी़डी़लोंढे, तलाठी डी़एमख़ान, देवराव मोहिते, जगदीश माने, नामदेव तांबारे, मल्हारी डुकरे, सरपंच जनार्दन खुडे उपस्थित होते़

Web Title: Typically -1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.