थोडक्यात जिल्हा.. बातम्या
By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:21+5:302015-09-01T21:38:21+5:30
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा
Next
स पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकोराडी : स्थानिक तायवाडे महाविद्यालय आणि राजेंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र महादुला यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एकदिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रवीण रामटेके, अतुल पाटील (एसटीआय), प्रा. डॉ. वर्षा वैद्य, राजेंद्र कुंभलकर यांची उपस्थिती होती. प्रारंभी राजेंद्र कुंभलकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ. वर्षा वैद्य यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी कसे महत्त्वाचे, याबाबत विचार मांडले. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे तसेच वाचनालयातील पुस्तकांचे सखोल वाचन करायला पाहिजे, असे मत प्रवीण रामटेके यांनी व्यक्त केले. अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे यांनी वेळ व अभ्यासाचे नियोजन, वर्तमानपत्रातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, विज्ञान व तंत्रज्ञान, चालू घडामोडी आदींचे नियमित वाचन करावे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. संचालन बिरखेडे हिने तर आभार कांचन ठाकरे हिने मानले. (प्रतिनिधी)....खो-खोमध्ये चैतन्येश्वर विद्यालय विजयीसाळवा : स्थानिक चैतन्येश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. कुही येथील क्रीडा संकुलात नुकतेच तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन पार पडले. यामध्ये सदर शाळेतील १४ वर्षे वयोगटातील खो-खो स्पर्धेमध्ये मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावीत तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. विजयी संघाला क्रीडा शिक्षक भोयर, शेंडे, गोवर्धन सायरे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संचालक सीताराम रडके, मुख्याध्यापक गोसावी, पर्यवेक्षक भोयर, लांबट, फरकाडे, रडके, हिरेखण तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. (वार्ताहर)