पेन स्टेटबरोबर संयुक्त पदवी अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ: दोन्ही विद्यापीठाचे प्राध्यापक करणार चर्चा
By admin | Published: August 31, 2015 09:30 PM2015-08-31T21:30:31+5:302015-08-31T21:30:31+5:30
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठ यांचा संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.मात्र,या अभ्यासक्रमात कोणत्या घटकांचा समावेश असावा,अभ्यासक्रम ऑनलाईन की ऑफलाईन पध्दतीने शिकवावा,कोणते प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील,या घटकांवर दोन्ही विद्यापीठांमधील तज्ज्ञ प्राध्यापक चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.पेन स्टेट विद्यापीठाबरोबरचा शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यास तो सर्वात मोठा अंतरराष्ट्रीय उपक्रम असेल,असा दावा,असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Next
प णे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेन स्टेट विद्यापीठ यांचा संयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.मात्र,या अभ्यासक्रमात कोणत्या घटकांचा समावेश असावा,अभ्यासक्रम ऑनलाईन की ऑफलाईन पध्दतीने शिकवावा,कोणते प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील,या घटकांवर दोन्ही विद्यापीठांमधील तज्ज्ञ प्राध्यापक चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत.पेन स्टेट विद्यापीठाबरोबरचा शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यास तो सर्वात मोठा अंतरराष्ट्रीय उपक्रम असेल,असा दावा,असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नॉर्वे,एमआयटी,गॉटींजन या विद्यापीठांशी झालेल्या शैक्षणिक करारामुळे विद्यापीठाला खूप मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला आहे.देशात कोणत्याही विद्यापीठाला निधी मिळाला नसेल एवढा निधी पेन स्टेट विद्यापीठाकडूनही पुणे विद्यापीठाला मिळू शकेल,असा दावा गाडे यांनी केला आहे.या प्रसंगी माजी कुलगुरू एन.जे.पवार, विद्यापीठाच्या अंतररष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ.विजय खरे उपस्थित होते.पेन स्टेट विद्यापीठाचे 13 ज्येष्ठ प्राध्यापक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुमारे 45 प्राध्यापक येत्या 2 व 3 सप्टेबर रोजी बालेवाडी येथे याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापक या अभ्यासक्रमावर सकारात्मक पणे काम करत आहेत. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांसाठी संयुक्त पदवी अभ्यासक्रम उपलब्ध होणार होईल,असे नमूद करून डॉ.गाडे म्हणाले,दोन विद्यापीठांमधील सयुक्त पदवी अभ्यासक्रमासंदर्भातील कायद्यास मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांबरोबर अधिक चांगल्या पध्दतीने संयुक्त पदवी अभ्यासक्रम राबविता येईल.