विद्यापीठ विद्यार्थी परिषद पदग्रहण

By Admin | Published: February 16, 2015 09:12 PM2015-02-16T21:12:42+5:302015-02-16T21:12:42+5:30

सोहळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?

University Student Council Meeting | विद्यापीठ विद्यार्थी परिषद पदग्रहण

विद्यापीठ विद्यार्थी परिषद पदग्रहण

googlenewsNext
हळा विद्यार्थ्यांचा की राजकीय संघटनांचा?
नागपूर विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

(फोटो आहे- रॅपमध्ये)
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा अखेर सोमवारी पार पडला. निवडणुकांनंतर सुमारे चार महिन्यांनंतर पार पडलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांऐवजी पक्ष व संघटनांच्या धोरणांबाबत माहिती देण्यावरच जास्त भर दिला. त्यामुळे हा सोहळा विद्यार्थ्यांचा होता की राजकीय पक्षांचा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
रामदासपेठ येथील श्रीमंत पूर्णचंद बुटी सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिरा सुरू झालेल्या या सोहळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी पदग्रहण केले. विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष नितेश फुलेकर, सचिव बालाजी रामराव माट्टमवाड अणि सर्व प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांची उपस्थिती होती. शिवाय राष्टवादी युवक काँग्रेस राज्य प्रदेश उपाध्यक्ष सलिल देशमुख, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निशिकांत काशीकर, जगदीश पंचबुधे, डॉ.अविनाश तितरमारे, अभाविपच्या प्रदेश मंत्री शुभांगी नक्षिणे, उपाध्यक्ष प्रा.अजय चौहान, महानगर मंत्री गौरव हरडे हेदेखील उपस्थित होते.
विद्यापीठात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. विद्यार्थी परिषदांच्या माध्यमातून या समस्या प्रशासनामोर येतात. विद्यार्थी परिषदांच्या हातात विद्यापीठाची प्रतिमा असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या योग्य मागण्यांवरच संघटनांनी आंदोलन करावे असे मत डॉ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले. देशात नवीन नेतृत्व निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन निवडणुका आवश्यक आहेत. स्पर्धेच्या युगात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बदल अपेक्षित आहेत असे प्रतिपादन अतुल लोंढे यांनी केले. तर विद्यार्थी परिषदेला बळकट करण्याची आवश्यकता असताना प्रशासनाकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे असा चिमटा प्रा.अजय चौहान यांनी काढला. याशिवाय विद्यार्थी संघटनांकडून मार्गदर्शन करणाऱ्या वक्त्यांनी पक्ष व संघटनांचे धोरण मांडण्यावरच जास्त भर दिला.

Web Title: University Student Council Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.