वेळुकर पुन्हा विद्यापीठात
By admin | Published: March 8, 2015 12:30 AM2015-03-08T00:30:59+5:302015-03-08T00:30:59+5:30
वेळुकर पुन्हा विद्यापीठात
Next
व ळुकर पुन्हा विद्यापीठातप्रभारी कुलगुरुंना पदावरुन केले मुक्तमुंबई :मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळुकर यांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी राज्यपालांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी कुलगुरुंनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला. वेळुकरांना पदापासून दूर केल्याने त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले प्रभारी कुलगुरु नरेश चंद्र यांना वेळुकरांनी पदावरुन मुक्त केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळुकर यांना पदावरुन दूर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसांमध्येच सवार्ेच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायालयाचे आदेश येताच वेळुकर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानुसार गुरुवारी राज्यपालांनी वेळुकरांना पुन्हा पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी धुलिवंदनाची शासकीय सुी असल्याने त्यांनी शनिवारी आपल्या पदाचा कार्यभार पुन्हा घेतला.सकाळी वेळुकर कार्यालयीन वेळेत विद्यापीठात दाखल झाले. महत्वाच्या आणि प्रलंबित प्रश्नांविषयी त्यांनी विद्यापीठातील अधिकार्यांशी चर्चा केली. तसेच विद्यापीठाचे रखडलेले निकाल याविषयी सोमवार ९ मार्च रोजी परीक्षा कमिटीची बैठक आयोजित केली आहे. वेळुकर यांनी यापुर्वी प्रमाणेच पहिला दिवस सुरळीत पार पडला.वेळुकर यांना पदापासून दूर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी कुलगुरु म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरु नरेश चंद्र यांची नेमणूक करण्यात आली होती. वेळुकर पुन्हा विद्यापीठात रुजू झाल्याने त्यांनी आपल्या पदापासून नरेश चंद्र यांना मुक्त केले. त्यानुसार नरेश चंद्र विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.