भररस्त्यात वरुण धवनसारखी हिरोगिरी तुम्हीही करताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 05:27 PM2017-11-23T17:27:10+5:302017-11-23T17:29:41+5:30

सेलिब्रिटी असून पोलीसांनी वरुण धवनचा कान धरला पण बाकी रोड रोमिओंचं काय?

varun dhawan selfie stunt on road : what about your herogiri? | भररस्त्यात वरुण धवनसारखी हिरोगिरी तुम्हीही करताय का?

भररस्त्यात वरुण धवनसारखी हिरोगिरी तुम्हीही करताय का?

googlenewsNext
ठळक मुद्देगाडी चालवताना स्टण्ट करण्याला हिरोगिरी नाही तर माकडचाळेच म्हणतात, हे तरुणांना कधी कळणार?

मुंबई पोलीसांनी वरुण धवनचा कान धरत त्याला चांगला दम भरला याची बातमी आज व्हायरल आहे. पोलीसांचं व्टिट आणि वरुणचा एका वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलेला फोटोही इंटरनेटवर चकरा मारतोय. वरुण धवनने भररस्त्यात गाडीतून बाहेर डोकावत एका फॅन मुलीबरोबर सेल्फी काढला. तो फोटो प्रसिद्धही झाला. फॅनला वरुणने नाराज केलं नाही यासाठी त्याचं कौतूक असलं तरी पोलीसांनी मात्र त्याला ट्राफिक नियम व्टिट करुन सांगितले आणि बजावलं की अशी ¨हरोगिरी फक्त सिनेमात कर, प्रत्यक्षात नको. बाकी तुला इ चालान पाठवतोय ते भर. पुन्हा असं केलंस तर कठोर कारवाई करु! वरुणला तर पोलीसांचा मेसेज कळला असेल पण रस्त्यावरच्या तरुण हौशी बायकर्सचं आणि गाडय़ा चालवणार्‍याचं काय? ते करतातच अशी रोडगिरी.
त्यातले काही नमूने तर आपल्या अवतीभोवतीही दिसतात.

त्यातलेच हे काही स्टण्टमॅन.
1) अनेकजण बाइक चालवतानाच मान वाकडी करकरुन फोनवर बोलतात. 
2) धूम स्टाईल ट्रिपल सीट गाडय़ा चालवतात. सुसाट.
3) अनेकांच्या गाडय़ांचे हॉर्न इतके कर्कश असतात की बाकी पब्लिक दचकतंच.
4) बाइक चालवताना उभं राहणं, ओरडणं सर्रास चालतं.
5) टू व्हीलर रस्त्यात, टर्नवरच उभं राहून टोळकी गप्पा मारतात ते वेगळंच.
6) टू व्हीलर ठीकच पण कार चालवतानाही बोलणं सर्रास असतात.
7) काहीजण गाडी रस्त्यातच उभी करुन बोलत बसतात.
8) डबल पार्कीग नावाचा आजार तर सर्वत्र दिसतो.
9) गाडीच्या काचेतून, छतातून डोकं बाहेर काढून उभं राहून स्टण्ट करणारे हिरो तर शहरागणिक दिसतात.
10) चालत्या गाडीतून सेल्फी काढणारे बहाद्दरही कमी नाही.
11) यासार्‍यांना वाहतुकीचे नियम कोण समजावणार? सिगAलवर न उभं राहणं या आजारातून मुक्त होण्याची तर काही शक्यताच दिसू नये इतकी परिस्थिती भिषण आहे. असं का होतं याचा विचार तरुणांनी करायला हवा. पोलीस ते करतील आणि कारवाईचा बडगा उगारतील तेव्हाच आपण सुधारू याला काही अर्थ नाही. 

Web Title: varun dhawan selfie stunt on road : what about your herogiri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.