वेसावकर होणार टेक्नोसॅव्ही

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30

वेसावकर होणार टेक्नोसॅव्ही

Vesavkar will be technosavi | वेसावकर होणार टेक्नोसॅव्ही

वेसावकर होणार टेक्नोसॅव्ही

Next
सावकर होणार टेक्नोसॅव्ही
वेसावकरांना मोफत टॅब भेट
वेसावे: मासेमारी हा वेसावकरांचा मुख्य व्यवसाय. वेसावकरांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी वेसावकरांनी एकत्र येऊन वेसावे, यारी मार्ग येथे वेसावे विद्यामंदिरची स्थापना केली आणि येथे १९८४ साली वेसावा कोळी समाज संचलित वेसावा विद्या मंदिर ही शाळा सुरु झाली. गेली तीन वर्षे शालांत परीक्षेत १०० टक्के निकाल लागलेल्या या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या शाळेतील इयत्ता ८वीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून टेक्नोसॅव्ही होण्यासाठी मोफत टॅबचे वितरण करण्यात आले.
उत्तर पि›म मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते आणि आमदार डॉ.अनिल परब यांच्या उपस्थितीत शाळेत हा सोहळा पार पडला. या समारंभात शाळेतील आठवीच्या मराठी माध्यमाच्या ११२ विद्यार्थ्यांना आणि ४८ इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे देण्यात आला. यावेळी महिला विभागसंघटक राजूल पटेल, वेसावा विद्या मंदिरचे अध्यक्ष जनार्दन आलेसा, सचिव नारायण कोळी, उपाध्यक्षा आशा झेमणे, शाळेच्या मराठी विभागाचे मुख्याध्यापक अनिल भावसार, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्वरी शर्मा, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, महिला उपविभागसंघटक मनीषा मोरे व शीतल सावंत, शाखाप्रमुख सूर्यकांत खवळे, महिला शाखा संघटक जागृती भानजी, संजना हरळीकर, माजी नगरसेवक विष्णू कोरगांवकर आदी उपस्थित होते. वर्सोवा आरटीओ जवळील कमलादेवी जैन हायस्कूलच्या इयत्ता आठवीच्या ६४ विद्यार्थ्यांना देखील मोफत टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य अनिल व्यवहारे, विश्वस्त व्ही.बी.आरुसकर उपस्थित होते. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश)फणसे यांनी यासाठी पाठपुरावा केला.
टॅबमध्ये पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजण्यासाठी ॲनिमेशन,२१ नमुना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे, डिक्शनरी यांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी नववी आणि तिसर्‍या वर्षी दहावीचा अभ्यासक्रमाचा या टॅबमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vesavkar will be technosavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.