अभियांत्रिकी प्राध्यापकांचा आंदोलनाचा इशारा
By Admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:51+5:302015-02-14T23:51:51+5:30
पुणे: अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची 80 टक्के थकित रक्कम मिळावी. या मागणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राजपत्रित अध्यापक/ अधिकारी संघाने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागातील अध्यापकांना ही रक्कम देण्यात आली असून केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापक यापासून वंचित राहिले आहेत.शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही थकीत रक्कमेकडे दूर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने एक दिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे.
प णे: अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची 80 टक्के थकित रक्कम मिळावी. या मागणीसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील राजपत्रित अध्यापक/ अधिकारी संघाने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील उच्च शिक्षण विभागातील अध्यापकांना ही रक्कम देण्यात आली असून केवळ अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापक यापासून वंचित राहिले आहेत.शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही थकीत रक्कमेकडे दूर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालय संघाने एक दिवसीय उपोषणाचा इशारा दिला आहे.----------