दहावी झाली आता पुढे काय? मुकबधिर विद्यार्थी व पालकांपुढील प्रश्न

By Admin | Published: June 15, 2015 09:29 PM2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

पुणे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून दुर राहण्याची वेळ येत आहे. अशावेळी काही विद्यार्थी आयटीआय किंवा इतर व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.

What is next 10th? The questions next to the students and the parents of the deceased | दहावी झाली आता पुढे काय? मुकबधिर विद्यार्थी व पालकांपुढील प्रश्न

दहावी झाली आता पुढे काय? मुकबधिर विद्यार्थी व पालकांपुढील प्रश्न

googlenewsNext
णे : तल्लख बुध्दी असली तरी बोलता व ऐकू न येणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांपुढे दहावी झाली आता पुढे काय? हा प्रश्न पडला आहे. दहावीनंतर पुढे अकरावी-बारावी करून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असली तरी त्यांच्यासाठी विशेष महाविद्यालये नसल्याने त्यापासून दुर राहण्याची वेळ येत आहे. अशावेळी काही विद्यार्थी आयटीआय किंवा इतर व्यवसाय कौशल्य अभ्यासक्रमाचे शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वि. रा. रूईया मुकबधिर विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश मिळविले आहे. विद्यालयातील १६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. केतन गव्हाणे या विद्यार्थ्याने ६४.६० टक्के गुण मिळवित शाळेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो मुळचा भीमा कोरेगावचा. इयत्ता सहावीपासून तो या शाळेत शिकत आहे. मागील सहा वर्ष तो दररोज बसने प्रवास करून शाळेत येत होता. सकाळी आठ वाजता घरातून निघायचे आणि पुन्हा बारा तासांनंतर घरी जायचे. हा त्याचा दररोजचा दिनक्रम. मात्र, तरीही त्याने जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करून प्रथम श्रेणी मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळविला आहे. असे असले तरी आता त्याचे वडील अरूण गव्हाणे यांच्यापुढे त्याला कोणते शिक्षण द्यायचे हा प्रश्न पडला आहे. ते भीमा कोरेगावमध्येच शेती करतात.
गव्हाणे म्हणाले, त्याची पुढे शिक्षण्याची खुप इच्छा आहे. मात्र इथे जवळपास कुठेच त्यांना शिक्षण देणार्‍या संस्था नाहीत. किंवा तशी सुविधाही कुठल्या संस्थेत नाहीत. त्यामुळे थेट आयटीआयला प्रवेश घेवून त्याला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा विचार आहे. पण तो आयटीआय करण्यास नकार देत आहे. हैद्राबादमध्ये एक संस्था असून तिथे जाण्याची त्याची इच्छा आहे. पण त्यासाठी किती खर्च येणार, हे माहिती नाही. त्यानेही पुढे शिकले पाहिजे असेच वाटते. शिकला नाही तर पुढे काहीच भवितव्य नाही.
शाळेच मुख्याध्यापक आत्माराम दुतोंडे यांनी शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मुलांमध्ये गुणवत्ता खुप असते. शाळेत शिक्षक तसेच सर्व कर्मचारी त्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करतात. मात्र, पुढे त्यांच्यासाठी विशेष शिक्षणाचे मार्ग बंद होतात. काही विद्यार्थी नियमित विद्यार्थ्यांबरोबर प्रवेश घेतात. पण त्यांना खुप अडचणी येतात.
---------------
बातमी जोड आहे.

Web Title: What is next 10th? The questions next to the students and the parents of the deceased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.