शिक्षकांचे पगार कधी करणार
By admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:30+5:302017-03-23T17:18:30+5:30
नागपूर : जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे पगार अजूनपर्यंत झाले नाही. शिक्षकांचे पगार त्वरित करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जि.प. सीईओंना दिला. शिक्षण व लेखा विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार तसेही उशिरा होतात. फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून आयकर कपात करावयाची असल्याने आठवडाभर पगार उशिरा होणे अपेक्षित असते. परंतु आज तीन आठवड्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांचे पगार झाले नाही. शासनाकडून पगारासाठी कोषागारास बीडीएस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांचे आत लेखा विभागाने कोषागाराक डे बिल सादर करणे आवश्यक होते. परंतू जि.प.च्या लेखा विभागाकडून विहित मुदतीत बिल सादर केले गेले नाही. त्यामुळे दोनवेळा बीडीएस रद्द झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाध्
Next
न गपूर : जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे पगार अजूनपर्यंत झाले नाही. शिक्षकांचे पगार त्वरित करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जि.प. सीईओंना दिला. शिक्षण व लेखा विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांचे पगार तसेही उशिरा होतात. फेब्रुवारी महिन्याच्या पगारातून आयकर कपात करावयाची असल्याने आठवडाभर पगार उशिरा होणे अपेक्षित असते. परंतु आज तीन आठवड्याचा कालावधी लोटूनही शिक्षकांचे पगार झाले नाही. शासनाकडून पगारासाठी कोषागारास बीडीएस प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांचे आत लेखा विभागाने कोषागाराक डे बिल सादर करणे आवश्यक होते. परंतू जि.प.च्या लेखा विभागाकडून विहित मुदतीत बिल सादर केले गेले नाही. त्यामुळे दोनवेळा बीडीएस रद्द झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्या नेतृत्वात सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी सुरेश साबळे, दिनकर उरकांदे, रामू गोतमारे, विलास काळमेघ, धनराज बोडे, सुरेश श्रीखंडे, नीलकंठ लोहकरे, मीनल देवरणकर, सुरेंद्र कोल्हे, सतीश देवतळे, शरद इटकेलवार, नंदकिशोर वंजारी, प्रकाश सव्वालाखे आदी उपस्थित होते.