यंदातरी मिळणार का शिक्षकांना टॅब ?
By admin | Published: August 8, 2015 12:23 AM2015-08-08T00:23:50+5:302015-08-08T00:23:50+5:30
पुणे : शिक्षण मंडळाच्या शाळेतील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मागील वर्षी प्रशासकीय मान्यते अभावी टॅबचे बक्षीस देता आले नाही. या वर्षी महापालिकेकडे अर्थसंकल्पीय खर्चाचे अधिकार आहेत. त्यामुळे आदर्श शिक्षकांना यंदातरी टॅबचे बक्षीस मिळावे, अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी केली आहे.
Next
प णे : शिक्षण मंडळाच्या शाळेतील आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मागील वर्षी प्रशासकीय मान्यते अभावी टॅबचे बक्षीस देता आले नाही. या वर्षी महापालिकेकडे अर्थसंकल्पीय खर्चाचे अधिकार आहेत. त्यामुळे आदर्श शिक्षकांना यंदातरी टॅबचे बक्षीस मिळावे, अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या शाळेतील आदर्श शिक्षकांना टॅब व दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय २०१४ मध्ये झाला होता. मात्र, गेल्या वर्षी शिक्षण मंडळाच्या अर्थिक खर्चाचे अधिकाराचा घोळ व प्रशासकीय मान्यतेस विलंब झाला. त्यामुळे शिक्षकांना टॅबचे बक्षीस देण्यात आले नाही. यंदातरी महापालिकेच्या प्रशासनाने अर्थिक तरतूद व टॅब खरेदी करून ५ सप्टेंबरच्या शिक्षक दिनानिमित्ताने टॅबचे वाटप आदर्श शिक्षकांना करावे, अशी मागणी धुमाळ यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे आज केली. ------------------------