महात्मा फुलेंनी केलेले कार्य विशिष्ट जाती, समाजासाठी नव्हते
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30
यशवंत गोसावी यांचे प्रतिपादन : क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मित्रमंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा
Next
य वंत गोसावी यांचे प्रतिपादन : क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मित्रमंडळ आयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळाजायखेडा : क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य अलौकिक असून, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास सामान्य माणसाच्या उद्धाराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. महापुरु षांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे आजची गरज आहे. त्यांचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मित्रमंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानाच्या कार्यक्र मासारखे कार्यक्र म आयोजित करण्याची गरज आहे. थोरांचे विचार अंगीकारल्यास आदर्श समाज निर्मितीस वेळ लागणार नाही. महात्मा फुलेंनी केलेले कार्य विशिष्ट जाती, समाजासाठी नव्हते, तर ते सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी होते, म्हणूनच सर्वांनी जातिभेद विसरून, एकत्र आले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले.बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मित्रमंडळातर्फेआयोजित गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रा. गोसावी बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री बच्छाव होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते पंडितराव मोरे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गंगाधर गोसावी, माजी पंचायत समिती सभापती सोमनाथ ब्रााणकार, ज्येष्ठ नागरिक नारायण मोरे, दगडू पाटील, देवराम पगारे, माजी सरपंच आनंदराव जगताप, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण सोनवणे, उपसरपंच संजय मोरे, चेअरमन चंद्रसिंग सूर्यवंशी, व्हा. चेअरमन विश्वनाथ अहिरे, माजी चेअरमन अनिल अहिरे, संचालक गोरख शेवाळे, संतोष अहिरे, शांताराम शेवाळे, भास्कर शेवाळे, हिरतसिंग खैरनार, ग्रामपंचायत सदस्य अशोक जगताप, वाडी पिसोळचे माजी सरपंच दगा सोनवणे, संजय बच्छाव, माळी महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र खैरनार, उपाध्यक्ष डॉ. विशाल खैरनार, माजी अध्यक्ष गोरख मोरे, कैलास अहिरे, विजय लाडे, शांताराम जाधव, ग्रामपंचायत सदस्य कल्पना पाटील, अरु णा जगताप, सिंधूबाई अहिरे, बकूबाई सोनवणे, उषा कुवर, युवा व्याख्यात्या गौतमी धिवरे आदि उपस्थित होते. यावेळी गौतमी धिवरे यांनी शाहू-फुले-आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान दिले.स्वागत गीताने कार्यक्र माची सुरु वात झाली. त्यानंतर क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवजी महाराज, मॉँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महात्मा जोतिबा फुले गणेश मित्रमंडळाच्या वतीने प्रा. यशवंत गोसावी, गौतमी धिवरे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर इयत्ता पहिले ते बारावीपर्यंतच्या विविध क्षेत्रात गुणवत्ता मिळविलेल्या साठ गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व्ही. वाय. पाटील व अश्विनी बच्छाव यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.प्रा. गोसावी पुढे म्हणाले, आयुष्यात जीवनाची खरी मूल्ये जाणून घ्यायची असतील, तर युवकांनी क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, मॉँसाहेब जिजाऊ या महापुरु षांचे जीवनचरित्र अभ्यासावे व त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मातापित्यांसाठी सर्वस्व अर्पण करावे, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील सहकार्यांना एकत्र करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्य स्थापन केल्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन आपण जातीभेद, वर्णभेद न पाळता वाटचाल केली पाहिजे. शिवरायांचा हा आदर्श घेऊनच क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुलेंनी महाराजांना आपले गुरू मानले, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता जिजाऊ यांनी घडविले. आजच्या स्त्रियांनी कर्मकांड, अंधश्रद्धा, बुवाबाजी याच्या मागे न लागता आपल्या मुलांवर चांगले संस्कार करावेत. त्यांना सुसंस्कारित करावे. केवळ जयंती-पुण्यतिथी उत्साहाला निमित्त मात्र ठरून जातीधर्माच्या साखळदंडात आम्हीच जखडून ठेवलेले आमचे महापुरुष पाश्चात्यांना समजले. मात्र अजूनही आम्ही त्यांना पारखण्याचा शहाणपणा दाखवत नाही, अशी खंत प्रा. यशवंत गोसावी यांनी यावेळी बोलून दाखवली.जगात महापुरुष कसे घडले, आजच्या तरुणांनी इतिहास वाचावा, अभ्यास करावा. शेतकर्यांसाठी, समाजासाठी, दुर्बलांसाठी तरुणांनी कार्य करावे. संस्कार विकत मिळत नसतात, यासाठी विचारपीठे उभी करावी लागतात, याच प्रकारचे विचारपीठ महाविद्यालय व विद्यापीठ उपलब्ध करून देतात, याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.कार्यक्र माच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे, उपाध्यक्ष हिरामण जगताप, सदस्य अविनाश जाधव, पप्पू जाधव, गणेश महाले, गणेश बागुल, बारकू खैरनार, काळू खैरनार, शेखर नंदन, योगेश नंदन, योगेश लोंढे, समाधान बागुल, अशोक जगताप, बापू शेवाळे, सोनू जाधव, विकी सुतार, योगेश शेवाळे, बबलू जगताप आदिंनी परिश्रम घेतले. आभार प्रा. रविराज पाटील यांनी मानले. (वार्ताहर)फोटो :- (२५जायखेडा) जायखेडा येथील क्र ांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले मित्रमंडळाच्या वतीने प्रा. यशवंतराव गोसावी यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करताना प्रकाश शेवाळे, हिरामण जगताप, संजय बच्छाव, विजय लाडे आदिंसह मंडळाचे सदस्य.