वायसीएमयुचा सावळा गोंधळ
By Admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:50+5:302015-02-14T23:50:50+5:30
पुणे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प णे: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचे पदवी प्रमाणपत्र (डीग्री सर्टीफिकेट) दुस-या कोणत्याही विद्यार्थ्याला पाठविले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे डीग्री सर्टीफिकेट परीक्षा विभागाकडून योग्य पद्धतीने हाताळली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ पार पडल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे विद्यार्थ्यांना पोस्टाने त्याच्या पत्त्यावर डीग्री सर्टीफिकेट पाठविण्यात आले.परंतु, उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी (आ) या गावातील महादेव वसंतराव गुंड या विद्यार्थ्याच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. त्यामुळे या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांचे प्रमाणपत्र पोस्टामार्फत मिळू शकले नाहीत.महादेव गुंड या विद्यार्थ्याने सांगितले, कला शाखेची पदवी मी मे 2013 मध्ये प्राप्त केली.त्याचे पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मी विद्यापीठाला अर्ज केला होता. खरेतर वायसीएमयुकडे मी माझा पुण्यातील पत्ता दिला होता.परंतु,परीक्षा विभागाने माझ्या गावाकडच्या पत्त्यावर सविता शांतकुमार सोनवणे या विद्यार्थीनीचे पदवी प्रमाणपत्र पाठविले.परीक्षा विभागाकडून होत असलेल्या अशा निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठाच्या किंवा विद्यापीठाच्या विभागीय केंद्राला फेराव्या माराव्या लागत आहेत. मी स्वत:ने विभागीय केंद्रात जाऊन माझे प्रमाणपत्र घेवून आलो आहे.वायसीएमयुच्या परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ.अर्जुन घाटुळे यांच्याशी याबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.