तुम्ही परत येऊ नका
By admin | Published: March 20, 2015 12:12 AM2015-03-20T00:12:32+5:302015-03-20T00:12:32+5:30
पुणे: घरापासून दूर गेलेल्या मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा, अशी पालकांची भावना असते,परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विभागांमध्ये व विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इराकी विद्यार्थ्यांचे पालक त्यांना परत न येण्याचा सल्ला देत आहेत. आयएसआयएस दहशवादी संघटनेने इराकमध्ये सध्या बॉम्ब हल्ले सुरू केल्यामुळे इराणी नागरिकांचे जीवन अस्तव्यस्थ झाले आहे. अनेक इराकी नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांनी भारतात सुरक्षित रहावे, असे इराकी विद्यार्थ्यांचे पालक सांगत त्यांना आहेत.
Next
प णे: घरापासून दूर गेलेल्या मुलगा आपल्या डोळ्यासमोर असावा, अशी पालकांची भावना असते,परंतु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या विभागांमध्ये व विविध महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इराकी विद्यार्थ्यांचे पालक त्यांना परत न येण्याचा सल्ला देत आहेत. आयएसआयएस दहशवादी संघटनेने इराकमध्ये सध्या बॉम्ब हल्ले सुरू केल्यामुळे इराणी नागरिकांचे जीवन अस्तव्यस्थ झाले आहे. अनेक इराकी नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांनी भारतात सुरक्षित रहावे, असे इराकी विद्यार्थ्यांचे पालक सांगत त्यांना आहेत.विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रात इंग्रजी भाषा अभ्यासक्रमास अमार बंडार या इराकी विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या असून डिसेंबर 2014 मध्ये तो पुण्यात आला.त्यावेळी इराक मध्ये दहशवादी हल्ले होत नव्हते. परंतु,गेल्या काही महिन्यांंपासून त्यात वाढ झाली आहे. परिणामी इराकमधील अनेक नागरिक आयएसआयएस संघटनेच्या निशाण्यावर असलेल्या परिसरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जात आहेत. परंतु,काही नागरिक आयएसआयएसच्या बॉम्ब हल्ल्यांना बळी पडत आहेत.अशाच एका बॉम्ब हल्ल्यात अमार बंडार या विद्यार्थ्याचे दोन चुलत भाऊ मृत्यूमुखी पडले.अमेद खलील आणि तहा अल तुर्की हे त्याचे दोन चुलत भाऊ अंबीर येथे राहत होते,आयएसआयएसचा हल्ला होणार असल्यामुळे इराकी मिलीटरीने येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.परंतु, अमारचे चुलत भाऊ हिट या ठिकाणी जात असताना मृत्यूमुखी पडले. मिलिटरीने अमारच्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलवले होते.त्यामुळे गेले काही महिने त्याचा कुटुंबापासून संपर्क तुटला होता. परंतु,आता तो केवळ इंटरनेटच्या माध्यामातून आपल्या कुटुंनियांशी संपर्कात आहे.अमार म्हणाला,माझ्या दोन चुलत भावांच्या मृत्यूची माहिती मला गेल्या आठवड्यात फेसबुकवरून कळाली.फेसबूकवर हिट न्यूस असे पेज तयार करण्यात आले असून या ठिकाणी घडणा-या घटनांची माहिती प्रसिध्द केली जात आहे.मोबाईलद्वारे पालकांशी संपर्क होत नसल्यामुळे मी इंटरनेटच्या माध्यमातून पालकांशी संपर्क साधतो. दोन आठवड्यापूर्वी माझे पालकांशी बोलणे झाले त्यावेळी त्यांनी मला काळजीपोटी काहीही सांगितले नाही. परंतु,तु भारतातच रहा परत इराक मध्ये येऊ नको असेच ते मला सांगतात.आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक विजय खरे म्हणाले,या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी विद्यापीठातर्फे घेतली जात आहे. तसेच कौटुंबिक आधार देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. पुण्यात सुरक्षित वाट असल्यामुळे येथेच राहणार असे इराकी विद्यार्थी सांगतात.