जि.प. शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी २०० शाळा दत्तक घेणार
By Admin | Published: November 1, 2015 08:49 PM2015-11-01T20:49:56+5:302015-11-01T20:49:56+5:30
जळगाव : जि.प. शाळांमध्ये मुलांच्या गैरहजर राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. तरीही, मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे प्रशासनाला दिसत नसून त्यापार्श्वभूमीवर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्ात सर्वात जास्त मुलांच्या गैरहजरीचे प्रमाण ज्या शाळांमध्ये आहे, अशा २०० शाळा दत्तक घेतल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणत्तापूर्ण शिक्षण दिले जाणाार आहे.
ज गाव : जि.प. शाळांमध्ये मुलांच्या गैरहजर राहण्याचे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून झाले आहेत. तरीही, मुलांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची चिन्हे प्रशासनाला दिसत नसून त्यापार्श्वभूमीवर आता जि.प. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्ात सर्वात जास्त मुलांच्या गैरहजरीचे प्रमाण ज्या शाळांमध्ये आहे, अशा २०० शाळा दत्तक घेतल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणत्तापूर्ण शिक्षण दिले जाणाार आहे. राज्यभरात जळगाव जिल्ाच्या शैक्षणिक गुणवत्तेत घरसण झाली आहे. त्यानुसार गुणवत्ता वाढीसाठी जि.प. प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच स्टॉर्म (सिस्टिम फॉर टिचर रिपोर्टिंग ॲण्ड मॉनिटरिंग) ही प्रणाली कार्यान्वीत केली. या प्रणालीत नोंद झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ातील १८५३ शाळांपैकी २०० शाळांमध्ये मुला-मुलींचे गैरहजर राहण्याचे प्रमाण सर्वाधिक दिसून आले आहे. २४२ अधिकारी घेणार दत्तक जि.प. प्राथमिक शाळांमध्ये मुलांना आणण्यासाठी २४२ अधिकारी २०० शाळा दत्तक घेणार आहेत. त्यात १६४ केंद्र प्रमुख, ६४ विस्तार अधिकारी, १५ गटशिक्षणाधिकारी, ४ उपशिक्षणाधिकारी व २ शिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी दिली. शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करणार ज्या अधिकार्यांनी जि.प. शाळा दत्तक घेतली आहे. त्या शाळेच्या परिसरात संबंधित अधिकारी शाळाबा मुलांचे सर्वेक्षण करणार आहेत. तसेच प्रत्येक कुटुंबाना भेटी देणार असून त्या कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले जाणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस जि.प. शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी शाळेत राहत नसल्याची ओरड होत आहे. त्यापार्श्वभमीवर दत्तक घेणार्या सर्व शाळांमध्ये सर्वात प्रथम गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचे सूचित करण्यात आले आहे.