याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार

अनेक जण ही परिस्थिती सुधरावी याकरिता आपापल्यापरीनं योगदान देत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:12 PM2020-03-25T16:12:51+5:302020-03-25T16:14:03+5:30

whatsapp join usJoin us
27 Bangladesh cricketers combine to donate half of their salaries to fight Coronavirus svg | याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार

याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरसशी दोन-दोन हात करत आहे. या व्हायरसमुळे लोकांना घरात बंदिस्त रहावे लागत आहे. सरकार, सामाजिक संस्था आणि सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. श्रीलंकनं क्रिकेट मंडळानं त्यांच्या सरकारला कोट्यवधींची मदत केली, शाहिद आफ्रिदी पाकिस्तानातील 200 गरजुंना अन्न पुरवत आहे, सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांसाठी अन्न पुरवण्याची चळवळ उभी केली आहे. आता बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी त्यांच्या पगाराची निम्मी रक्कम बांगलादेश सरकारला कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

ढाका ट्रिबूनच्या माहितीनुसार 27 खेळाडूंपैकी 17 खेळाडू राष्ट्रीय करारात आहेत, तर उर्वरित 10 खेळाडूंनी नुकतेच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत सहभाग घेतला होता. या खेळाडूंच्या पगाराची रक्कम मिळून 23.25 लाखांचा निधी बांगलादेश सरकारला देणार आहे.  बांगलादेश क्रिकेटपटू तमीम इक्बालने फेसबूकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. 


''कोरोना व्हायरसशी संपूर्ण जग लढत आहे. बांगलादेशमध्येही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आम्ही क्रिकेटपटू आहोत आणि आम्ही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यामातून योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करत आहोत. पण, केवळ आवाहन करण्यापेक्षा आम्ही आणखी वेगळ्या पद्धतीनं सहकार्य करू शकतो. त्यामुळे आम्ही 27 क्रिकेटपटूंनी बांगलादेश सरकारला आपला निम्मा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वांची निम्मा पगार मिळून ही रक्कम 25 लाखांच्या आसपास पोहोचते,''असे तमीमने सांगितले.

तो पुढे म्हणाला,''ही रक्कम कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कदाचीत कमी पडेल, परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन मदत केल्यात परिस्थिती बदलता येऊ शकते. आपण सर्व एकत्र आलो, तर कोरोना विरुद्धचे हे युद्ध आपण नक्की जिंकू. कृपया करून घरीच थांबा, सुरक्षित राहा.'' 

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मृतांचा आकडा जवळपास 19 हजारांपर्यंत पोहोचला आहे. बांगलादेशमध्ये 39 जण मृत्यूमुखी पडली आहेत. बांगलदेशमध्ये 26 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीपर्यंत अंतर्गत विमानसेवा, सार्वजनिक वाहतुक आणि ट्रेन बंद केल्या गेल्या आहेत.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत

सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार

संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण

Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन

पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान

वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार  

हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट

Web Title: 27 Bangladesh cricketers combine to donate half of their salaries to fight Coronavirus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.