Join us  

एका षटकात ४३ धावा! इंग्लंडच्या गोलंदाजाची धुलाई; १३४ वर्षांच्या इतिहासातील महागडे षटक

इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने बुधवारी कौंटी अजिंक्यपद ( County Championship) स्पर्धेत नकोसा विक्रम नावावर नोंदवून घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 5:36 PM

Open in App

इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने बुधवारी कौंटी अजिंक्यपद ( County Championship) स्पर्धेत नकोसा विक्रम नावावर नोंदवून घेतला. ससेक्सकडून खेळणाऱ्या ऑली रॉबिन्सनने एका षटकात ४३ धावा दिल्या. कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील १३४ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक ठरले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १९९८ मध्ये अँड्य्रू फ्लिंटॉफने अॅलेक्स टुडोरच्या एका षटकात ३८ धावा कुटल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शोएब बशीरच्या एका षटकात डॅन लॉरेन्सने ३८ धावा कुटलेल्या.  

Sussex vs Leicestershire सामन्यात ससेक्सने पहिल्या डावात ४४२ धावांचा डोंगर उभा केला. कर्णधार जे सिम्पसनने १८३ धावांची वादळी खेळी केली. तर सलामीवीर ऑलिव्हर कार्टरने ९६ धावा केल्या. लिसेस्टरशायरला पहिल्या डावात २७५ धावाच करता आल्याने ससेक्सने १६७ धावांची आघाडी घेतली. लिसेस्टरशायरकडून हँड्सकोम्ब ( ९३ ) व वियान मल्डर ( ५३) यांनी अर्धशतक झळकावले. ससेक्सच्या सीन हंटने ४, तर रॉबिन्सनने तीन विकेट्स घेतल्या. ससेक्सने दुसरा डाव ६ बाद २९६ धावांवर घोषित करून ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले. 

दुसऱ्या डावात ससेक्सकडून टॉम हायनेस ( ४५), कार्टर ( ३१), सीन हंट ( ६५), अल्सोप ( ८१) व जेम्स कोलेस ( ४५) यांनी चांगली फलंदाजी केली. लिसेस्टरशायरला रिषी पटेल ( ४१) व इयान हॉलंड ( ३३) यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्यांचा संघ ७ बाद १७५ धावा असा गडगडला. तेव्हा लुईस किंबर व बेन कॉक्स यांनी मोर्चा सांभाळला. किंबरने आतापर्यंत ९२ चेंडूंत १८ चौकार व १६ चौकार खेचून नाबाद १९१ धावा केल्या आहेत आणि संघाला ६९ षटकांत ७ बाद ३७५ धावांपर्यंत पोहोचवले आहे. लिसेस्टरशायरला अजून ८९ धावा विजयासाठी हव्या आहेत.  

टॅग्स :कौंटी चॅम्पियनशिपइंग्लंड