५ कोटी वि. १.३ अब्ज; WTC Finalमधील पराभवावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा टीम इंडियाला चिमटा!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा ८ वर्षांचा दुष्काळ WTC Finalमध्ये संपवेल, असा अंदाज अनेक एक्स्पर्टनी व्यक्त केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 03:26 PM2021-07-02T15:26:24+5:302021-07-02T15:26:50+5:30

whatsapp join usJoin us
5 million vs 1.3 billion: Pak PM Imran Khan makes rhetorical point on India vs New Zealand WTC final | ५ कोटी वि. १.३ अब्ज; WTC Finalमधील पराभवावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा टीम इंडियाला चिमटा!

५ कोटी वि. १.३ अब्ज; WTC Finalमधील पराभवावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा टीम इंडियाला चिमटा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंड संघानं ८ विकेट्स राखून टीम इंडियावर विजय मिळवताना आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं ( ICC World Test Championship final) जेतेपद पटकावलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा ८ वर्षांचा दुष्काळ WTC Finalमध्ये संपवेल, असा अंदाज अनेक एक्स्पर्टनी व्यक्त केला होता. पण, केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली किवी संघानं इतिहास रचला.  

पाकिस्तानी खेळाडूंना मिळणारा पगार पाहून बसेल धक्का; तुम्हीच ठरवा भारतीय खेळाडूंच्या पगाराशी होईल का तुलना!

साऊदॅम्प्टन येथे झालेल्या या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरली. ३ बाद १४६ धावांवरून टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला, परंतु २१७ धावांवर संपूर्ण संघ तंबूत परतला. प्रत्युत्तरात किवींनी पहिल्या डावात २४९ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली. विराट कोहली अँड टीमला सामन्यात कमबॅक करण्याची संधी होती, परंतु दुसऱ्या डावातही टीम इंडियाचा डाव १७० धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य दोन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. 

किवींनी २००० मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती आणि त्यानंतर त्यांनी जिंकलेली ही पहिलीच आयसीसी स्पर्धा आहे. २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला अंतिम सामन्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

पाकिस्तानला १९९२ साली वन डे वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खन यांनीही WTC Final जिंकणाऱ्या किवी संघाचे अभिनंदन केलं. चायनीस पत्रकारासोबत बोलताना इम्रान खान यांनी टीम इंडियाला टोमणा हाणाला. ते म्हणाले,'' ५ कोटी लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंड संघानं १३० कोटी लोकसंख्या असलेल्या टीम इंडियाला नुकतंच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत केलं. उदयोन्मुख खेळाडूंचा शोध घेणे अन् त्यांच्या प्रतिभेला वाव देण्याचे काम न्यूझीलंडमध्ये केले जाते, त्यामुळेच त्यांनी हा विजय मिळवला.''
 

Web Title: 5 million vs 1.3 billion: Pak PM Imran Khan makes rhetorical point on India vs New Zealand WTC final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.