पाकिस्तानच्या अबीद अलीनं वन डे आणि कसोटी क्रिकेट पदार्पणात शतक झळकावणाऱ्या पहिल्या पुरुष क्रिकेटपटूचा मान पटकावताना वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. कराची येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळून श्रीलंकेनं 271 धावा केल्या. पण, पाकिस्ताननं दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. शान मसूद आणि अबीद अली यांनी पहिल्या विकेटसाठी 60 षटकांपर्यंत 246 धावांची भागीदारी केली. मसूद आणि अबीद या दोघांनीही शतकी खेळी केली, परंतु अबीदचे शतक पराक्रमी ठरले. त्यानं तर थेट रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली.
पहिल्या कसोटी सामन्यातील तीन दिवस पावसानं वाया घालवले असले तरी अखेरच्या दिवशी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. पाकिस्तानचा फलंदाज अबीद अली यानं हा विश्वविक्रम केला. त्यानं श्रीलंकेच्या 6 बाद 308 धावांच्या प्रत्युत्तरात शतकी खेळी करताना हा विक्रम नावावर केला. अबीदचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता आणि त्यात त्यानं पहिले कसोटी शतक झळकावलं. अबीदनं नाबाद 109 धावा केल्या होत्या. कसोटी आणि वन डे क्रिकेटच्या पदार्पणात शतक झळकावणारा तो पहिलाच पुरुष फलंदाज ठरला. असा पराक्रम जगातल्या कोणत्याच पुरुष फलंदाजाला करता आलेला नाही. त्यानं मार्च 2019मध्ये वन डे पदार्पणात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 112 धावा केल्या होत्या.
त्याच अबीदनं दुसऱ्या कसोटीतही शतकी खेळी केली. कारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शतक झळकावणारा तो पाकिस्तानचा पहिलाच फलंदाज ठरला. जगात असा विक्रम करणारा तो नववा फलंदाज ठरला. यापूर्वी न्यूझीलंडच्या जिमी निशॅम ( 2014), भारताच्या रोहित शर्मा ( 2013), सौरव गांगुली ( 1996), ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग ब्लेवेट ( 1995), भारताच्या मोहम्मद अझरुद्दीन ( 1984), वेस्ट इंडिज अलव्हीन कालिचरण ( 1972), ऑस्ट्रेलियाच्या डॉज वॉल्टर्स (1965) आणि बिल पोनस्फोर्ड ( 1924) यांनी हा पराक्रम केला आहे.
अबीदचा विश्वविक्रम, पण इंग्लंडच्या महिला क्रिकेटपटूनं 1982सालीच केलेला 'हा' पराक्रम
अबीदच्या आधी म्हणजे 1982साली इंग्लंडच्या एका महिला क्रिकेटपटूनं वन डे व कसोटी पदार्पणात शतकाची नोंद केली होती. 37 वर्षांपूर्वी म्हणजेत अबीदचा जन्म होण्यापूर्वी हा विक्रम एका महिला क्रिकेटपटूंन नोंदवला होता. त्यामुळे वन डे आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा अबीद हा जगातला पहिला फलंदाज नाही. यापूर्वी इंग्लंडच्या एनीड बॅकवेल यांनी ही विक्रमी कामगिरी केली होती. त्यांनी 7 फेब्रुवारी 1982मध्ये बर्मिंगहॅम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे पदार्पणात 101 धावा चोपल्या होत्या. त्यानंतर 27 डिसेंबर 1968मध्ये कसोटी पदार्पणात त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 113 धावा केल्या. होत्या.
Web Title: Abid Ali becomes the first Pakistan batsman and the ninth overall to score tons in first two matches of Test career
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.