India U19 vs Japan U19 Vaibhav Sooryavanshi short but Electrifying Knock Video : १९ वर्षाखालील आशिया कप स्पर्धेत भारत-जपान यांच्यातील सामना शारजाह क्रिकेट स्टेडिमवर खेळवण्यात येत आहे. पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामान गमावल्यानंतर उर्वरित सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरला आहे.
दुसऱ्या सामन्यातही वैभव स्वस्तात परतला, पण यावेळी त्याच्या बॅटिंगमध्ये क्लास नजराणा दिसला
जपानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघावर पहिल्यांदा बॅटिंग करण्याची वेळ आली. आयुष म्हात्रे आणि आयपीएलमधील विक्रमी बोलीमुळे प्रकाशझोतात आलेल्या वैभव सूर्यवंशी या जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. पाकिस्तान विरुद्धच्या लढतीत अवघ्या एका धावेवर बाद झालेल्या १३ वर्षीय वैभवनं दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात केली. त्याला आपली ही खेळी मोठी करण्यात अपयश आले. पण आपल्या या छोट्याखानी खेळीनं त्याने आपल्या भात्यातील क्लास दाखवून दिला आहे.
फटकेबाजीची झलक डोळ्याचं पारण फेडणारी अशीच
जपान विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने २३ चेंडूत २३ धावा केल्या. आयुष्य म्हात्रेसोबत पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केल्यावर त्याने झेलबादच्या रुपात आपली विकेट गमावली. पण त्याच्या या छोटेखानी खेळीत त्याने आपल्या भात्यातील क्लास फटकेबाजीचा जो नजराणा पेश केला तो खरंच खास आहे. त्याने आपल्या या इनिंगमध्ये ३ खणखणीत चौकारांसह १ षटकारही मारला. त्याच्या भात्यातील फटकेबाजी पाहिल्यावर त्यानं किती धावा केल्या यापेक्षा १३ वर्षांचं पोरगं काय भारी खेळतंय! असेच शब्द ओठी येतील.
पाक विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीनं खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. वयाच्या १३ व्या वर्षी त्याने १९ वर्षांखालील भारतीय संघात एन्ट्री मारली आहे. भारताकडून या गटात खेळणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम पियुष चावलाच्या नावे होता. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ९ चेंडूंचा सामना केल्यावर त्याच्या खात्यात एक धाव जमा झाली होती. दुसऱ्या सामन्यात दुहेरी आकडा गाठल्यावर तो मोठी खेळी करेल, असे वाटत असताना त्याची विकेट पडली. त्याची ही खेळी बहरली नसली तरी या स्पर्धेत छोटा पॅक मोठा धमाका करणार याचे संकेत देणारी होती.
Web Title: ACC U19 Asia Cup 2024 India U19 vs Japan U19 Vaibhav Sooryavanshi Watch short but Electrifying Knock Hints Bright Future Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.